28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeराजकीयचंद्रशेखर बावनकुळेंनी डिवचले, राहूल गांधींच्या सभेपूर्वी बाळासाहेबांची काढली आठवण !

चंद्रशेखर बावनकुळेंनी डिवचले, राहूल गांधींच्या सभेपूर्वी बाळासाहेबांची काढली आठवण !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ ट्विट करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. गेल्या ६३ दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. दादरमधील शिवाजी पार्कवर मोठी सभा होणार आहे. या सभेला दिग्गज नेत्यांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार आहे. हाच मुद्दा पकडत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागती पत्करणार का?, असा सवाल उपस्थित केला आहे. ६३ दिवस सुरू असलेल्या या यात्रेची आज सांगता होणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ ट्विट करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. गेल्या ६३ दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. दादरमधील शिवाजी पार्कवर मोठी सभा होणार आहे. या सभेला दिग्गज नेत्यांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार आहे. हाच मुद्दा पकडत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागती पत्करणार का?, असा सवाल उपस्थित केला आहे. ६३ दिवस सुरू असलेल्या या यात्रेची आज सांगता होणार आहे.

या रॅलीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश देणार आहेत.

राहुल गांधी यांच्या या सभेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  उपस्थित राहणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, सभेपूर्वी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट करताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

‘काँग्रेसमुळे देश अखंड राहिला…’, संजय राऊतांनी केलं काँग्रेसचं तोंडभरून कौतुक

काय म्हणाले बावनकुळे?

शिवतीर्थ हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवतीर्थाशी भावनिक नाते आहे. या शिवतीर्थातून स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या दमदार भाषणाने देशभक्ती, हिंदुत्व आणि देशभक्तीचा पहिला जयघोष झाला.

याच शिवतीर्थावरून हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती.

इलेक्टोरल बॉन्डद्वारे भाजपने कसे कमवले करोडो रुपये? राहुल गांधींनी ४ मुद्द्यांमध्ये सांगितला मोदींचा फॉर्म्युला

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचेही स्मारक आहे, ज्यांनी म्हटले होते की, ‘मी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही, पण माझे दुकान बंद करू.’ राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांना त्यांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीनिमित्त अभिवादन करत नाहीत.

ते का करत नाही, असा सवाल राहुल गांधींना विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरेंकडे असेल का? आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतीला राहुल गांधी श्रद्धांजली वाहतील का? असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात आहे, , असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

लोकसभेचे बिगुल वाजलं; जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

आज या शिवतीर्थावर राहुल गांधी ‘न्याय यात्रा’ या नाटक कंपनीसोबत येणार आहेत. आता या शिवतीर्थावर जाऊन उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागती पत्करणार का? हा प्रश्न आहे, असं सांगत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले.
तसेच, उद्धव ठाकरे वैयक्तिक स्वार्थासाठी विसरले असतील, तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेसबद्दल काय म्हणाले होते ते ऐका!, असही बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी