32 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeराजकीय'मी पुन्हा आलो पण दोन पक्षांना फोडून', फडणवीस जरा स्पष्टच बोलले

‘मी पुन्हा आलो पण दोन पक्षांना फोडून’, फडणवीस जरा स्पष्टच बोलले

मी पुन्हा आलो, पण दोन पक्षांना फोडून आलो असं थेट वक्तव्य केल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. कॉंग्रेस न होती तो क्या होता ? या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील फोर सिझन हॉटेलमध्ये झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं. मी पुन्हा येईन हे फडणवीस यांचे वाक्य चांगलेच प्रसिद्ध झाले होते. या वाक्यावर फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपलं मत व्यक्त केलं आहे.

कॉंग्रेस न होती  तो क्या होता ? या पुस्तकाच्या प्रकाशन दरम्यान फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं.

लोकसभा लढवण्यासाठी संजय राठोडांवर दबाव; CM शिंदेंची घेतली भेट

दोन पक्ष फोडून आलो…

‘मी पुन्हा येईन’ अशा माझ्या वक्तव्यावरुन नेहमीच प्रश्न केला जातो. मी पुन्हा येईन हे केवळ वाक्य नव्हतं, त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन? हे सगळं होतं.. पण, हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. लोकांनी आम्हाला निवडून दिलं होतं.

पण, उध्दवजी यांनी स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही पुन्हा आलो तेव्हा कौतुक झालं नव्हतो, आलो तेव्हा टीका झाली, मला पुन्हा यायला अडीच वर्षे लागली पण, जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष फोडून आलो, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीत सांगितल.

‘काँग्रेसमुळे देश अखंड राहिला…’, संजय राऊतांनी केलं काँग्रेसचं तोंडभरून कौतुक

तसेच, कधी विरोधक तर कधी आपले लोकही शिव्या देत असतात, पण वेळ बदलते. आम्ही पण काही ऋषी मुनी नाहीये कधी कधी उत्तर द्यावं लागतं. पण राजकारणात उत्तर देण्याची योग्य वेळ साधावी लागते तेव्हाच लोक तुमचं ऐकतात. राजकारणात एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे संयम आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ती गोष्ट शिकलो असल्याचे फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.

यासोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांच्या फुटीवरही फडणवीस यांनी भाष्य केलं. शरद पवार यांनी मुलीला पुढे आणले तिला आपला वारसदार जाहीर केले आणि राष्ट्रवादी फुटली. तसाच प्रकार उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्यासाठी केला. त्यामुळे शिवसेना फुटली. परिवारवादामुळेच हे सगळे झाले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सक्षम व्यक्तीला डावलून नातेवाईकांना संधी देणे म्हणजेच परिवाद आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंनी डिवचले, राहूल गांधींच्या सभेपूर्वी बाळासाहेबांची काढली आठवण !

कॉंग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खरगे स्वत: काही निर्णय घेऊ शकत नाहीत. निर्णय राहुल गांधीच घेतात हे लोकांना माहीती आहे. काल गृहमंत्री म्हणाले की राष्ट्रवादी का फुटली. कारण पवारांनी पक्ष पुतण्याला नाही तर मुलीला दिला. मला विश्वास आहे की, भविष्यात राजकारण्यांची मुलं राजकारणात दिसली तरी स्वतःच्या सामर्थ्यावर आलेल असतील असे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी