राजकीय

राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी संघटना आक्रमक, उद्यापासून महिनाभर आंदोलन

टीम लय भारी

मुंबई :-  राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी (OBC Association) संघटना आक्रमक झाल्या आहेत. उद्यापासून महिनाभर ओबीसी (OBC Association) संघटना आंदोलन करणार आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात होणार आहे. ओबीसी संघटनांच्या (OBC Association) बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. नाशिकमधील भुजबळ फार्मवर झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले आहे.

ओबीसींचे (OBC) अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी संघटना (OBC Association) आक्रमक झाल्या आहेत. परवा म्हणजे 17 जून रोजी दुपारी 12 वाजता जिल्ह्याभरात रस्ता रोको आंदोलन करून आंदोलनाला सुरुवात होईल.

कोरोनाच्या नियमांचे पालन करून आंदोलन होणार, संभाजीराजेंचं आवाहन

“श्रीराम स्वयं न्याय हैं, सत्य हैं,” राहुल गांधींना नेमकं काय म्हणायचंय

Three Adani Group stocks lose 5% each despite clarification on reports of freeze on foreign funds

स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द

 सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना (OBC) मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

काय आहे प्रकरण?

आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांवर गेल्याप्रकरणी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान तत्कालीन फडणवीस सरकारने नागपूरसह अकोला, वाशिम, नंदूरबार व धुळे जिल्हा परिषदांना मुदतवाढ दिली. तसेच, नंदूरबार येथील एका सदस्याचे सदस्यत्‍व रद्द करण्यात आले. मुदतवाढ असल्याने सदस्यत्व रद्द करता येत नसल्याच्या कारणावरून सरकारच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले.

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा मुदतवाढीचा आदेश अयोग्य ठरवत सहा महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यावेळी सरकारने ओबीसींच्या (OBC) लोकसंख्येच्या आधारे जागा निश्चित करण्याचा अध्यादेश काढला. परंतु, ओबीसींच्या लोकसंख्येचा आकडा नसल्याने जागा निश्चित करता येणार नसल्याचे शपथपत्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिले. दरम्यान, राज्यात सत्तापरिवर्तन झाले. उद्धव ठाकरे सरकारने निवडणुका घेण्यास परवानगी देण्याची विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाने निकालाच्या अधिन राहून निवडणुका घेण्यास परवानगी दिली. पाचही जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानुसार 27 टक्के नुसारच जागा निश्चित करायच्या आहेत.

उद्यापासून मराठा मोर्चा  

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. येत्या 16 जूनला म्हणजेच उद्यापासून कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. हे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी असेल. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावे लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावे लागेल, असे संभाजीराजे म्हणाले.

Rasika Jadhav

Recent Posts

नाशिकचा तापमानाचा पारा 41.8 अंशांवर

नाशिकमध्ये सलग चौथ्या दिवशी तापमानाचा (Temperature) पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता वाढली…

7 hours ago

मुंढेगावजवळ विहिरीत आढळला मायलेकींचा मृतदेह

मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील एका विहिरीत २३ वर्षीय विवाहित महिलेसह तिच्या…

7 hours ago

विमा प्रतिनिधीनेच घातला ठेवीदारांना करोडोंचा गंडा

विमा प्रतिनिधीनेच ठेवीदारांना करोडोंचा गंडा (duped) घातल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधील मनमाड येथे घडला आहे. युनियन…

8 hours ago

राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून गदारोळ, भाजपनेही साधला जोरदार निशाना

भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी लष्कराचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)…

8 hours ago

देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबतचे निर्देश

पुण्यामध्ये (Pune Porsche Accident) शनिवारी रात्री महागडी पोर्श गाडी बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने अनिश अवधिया…

10 hours ago

आठ वर्षीय बालिकेचे अपहरण व खुनाप्रकरणी दोघांना अटक

मालेगाव तालुक्यातील अजंग येथील आठ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण व खून प्रकरणाचा ( kidnapping and…

10 hours ago