30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयकोरोनाच्या नियमांचे पालन करून आंदोलन होणार, संभाजीराजेंचं आवाहन

कोरोनाच्या नियमांचे पालन करून आंदोलन होणार, संभाजीराजेंचं आवाहन

टीम लय भारी

मुंबई :-  सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे मराठा समाज आणि संभाजी राजे (Sambhaji Raje) आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मूक आंदोलनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी समाजाला शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर कोरोना (Corona) प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे पालन करुन हे आंदोलन करण्यात यावे असेही संभाजीराजेंनी समाजाला सांगितले आहे (Sambhaji Raje has also told the society that the agitation should be carried out in compliance with all the rules of Corona ban).

कोल्हापुरात शाहू समाधीस्थळावरुन संभाजीराजे (Sambhaji Raje) संवाद साधत होते. तेव्हा संभाजीराजे (Sambhaji Raje) म्हणाले की, कोल्हापुराला वैचारिक, पुरोगामी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून करत आहोत. त्याचबरोबर त्यांनी शांततेत आंदोलन पार पाडण्याचे आवाहनही केले आहे. संभाजीराजे (Sambhaji Raje) म्हणाले, आंदोलनादरम्यान कोणीही कोणत्याही लोकप्रतिनिधींना काहीही उलटसुलट बोलू नये. त्यांचा मान-सन्मान राखून त्यांच्याशी वागा. हे मूक आंदोनल शिस्तीत पार पाडायला हवे.

“श्रीराम स्वयं न्याय हैं, सत्य हैं,” राहुल गांधींना नेमकं काय म्हणायचंय

अजित पवार आणि शाहू महाराजाच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी व्यक्त केले मत…

Interview: No evidence that children will be hit worse in the third wave of the pandemic in India

तसेच आंदोलनादरम्यान कोरोना (Corona) प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहनही संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) केले. संभाजीराजे (Sambhaji Raje) म्हणाले, कोरोनाचा (Corona) धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे सर्व आंदोलकांनी हे मूक आंदोलन सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना (Corona) प्रतिबंधाचे इतर नियम पाळून करायचे आहे. एकमेकांपासून लांब, सोशल डिस्टन्सिंग पाळत बसून या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी