34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्र"श्रीराम स्वयं न्याय हैं, सत्य हैं," राहुल गांधींना नेमकं काय म्हणायचंय

“श्रीराम स्वयं न्याय हैं, सत्य हैं,” राहुल गांधींना नेमकं काय म्हणायचंय

टीम लय भारी

मुंबई :- अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून जमा करण्यात आलेल्या निधीमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत. राम मंदिर संस्थानाने मंदिरासाठी खरेदी केलेल्या जागेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी भाजपावर टीकेची तोफ डागली.

प्रभू श्रीरामांच्या (Shriram) नावाखाली दिलेल्या हा धोका म्हणजे अन्याय आहे असे ते म्हणाले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. प्रभू श्रीराम (Shriram) हे स्वतः न्याय, सत्य आणि विश्वासाचे प्रतिक आहेत. त्याच्या नावाखाली दिलेला हा धोका म्हणजे जणू पापच आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे तसेच त्यांनी मंदिरासाठी जमीन खरेदी करताना मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोपही केला आहे.

अजित पवार आणि शाहू महाराजाच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी व्यक्त केले मत…

सुशांतसिंगच्या मृत्यूचे गूढ सीबीआय का लपवत आहे?; सचिन सावंत

Ram temple land deal is transparent, claims Trust amid accusations of corruption

काँग्रेसचे म्हणणे आहे की श्रीराम (Shriram) जन्मभूमी तीर्थक्षेत्र संस्थानाने अयोध्येतली दोन कोटी रुपये किमतीची जमीन १८ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी सरकारच्या खासगीकरणाला समर्थन देण्याच्या भूमिकेवरुन निशाणा साधला आहे. यामुळे लोकांना कोणतीही मदत होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. परंतु हे आरोप ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून फेटाळले. खुल्या बाजारातील किमतींपेक्षा कमी दराने ट्रस्टने जमीन खरेदी केली असून, राजकीय द्वेष पसरवण्यासाठी बिनबुडाचे आरोप होत असल्याचा दावा चंपत राय यांनी निवेदनाद्वारे केला. याप्रकरणी चौकशीची मागणी कॉंग्रेससह विरोधकांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी