राजकीय

…तर गालावर वळ उठतील, राज ठाकरेंचा इशारा, जव्हारमध्येही परप्रांतीयाची मुजोरी

मुंबईच्या मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर यांना मराठी आहेत म्हणून जागा नाकारण्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला. त्यानंतर कांदिवलीत परप्रांतीय तरुणांकडून मराठी युवकाला मारहाणीचा प्रकारही सोमवारी उघडकीस आला आहे. हे कमी म्हणून की काय जव्हारमध्ये एका आदिवासी ग्रामसेवकाला परप्रांतीयाने मारहाण केल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक झालाय. महाराष्ट्रात परप्रांतीयांची मुजोरी वाढत असून मराठी माणसावरच दादागिरी, घर नाकारण्याची त्यांची हिंमत होत असल्याचे राज्यात संतापाची लाट उसळलीय. या तिन्ही घटनांनंतरही सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनीही सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तृप्ती देवरुखकर यांनी आज शिवतीर्थावर जाऊन शर्मिला ठाकरे यांची भेट घेऊन वेळीच पाठिशी उभे राहिल्याबद्दल आभार मानले आहेत.

तृप्ती देवरुखकर यांना मुलुंडमधील एका सोसायटीत ऑफिससाठी जागा हवी होती. पण त्या मराठी असल्याचे सांगत त्यांना मानहानीकारक पद्धतीने जागा नाकारण्यात आली होती. त्यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर करताच वातावरण चांगलेच तापले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारताच त्यांची चांगलीच तंतरली. अखेरी त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी तृप्ती देवरुखकर आणि मराठी माणसांची माफी मागितली. त्यानंतर आज तृप्ती देवरुखकर यांनी शर्मिला ठाकरेंची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

दरम्यान, यावरून राज ठाकरेंनीही ट्वीट करत चांगलाच दम भरलाय. ‘हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित.’ असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. त्याचवेळी सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे, असे सरकारला सुनावले आहे.

जव्हारमध्येही परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला मारहाण करण्याची घटना घडलीय. या ग्रामसेवकाने त्याची दुचाकी जव्हारमधील एसटी स्टँड परिसरात लावली होती. तिथेच या फूलविक्रेत्याचा स्टॉल आहे. यावरून त्यांने ग्रामसेवकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणानंतर आदिवासी संघर्ष समिती आक्रमक झाली असून या परप्रांतीय फूलविक्रेत्यावर कारवाई करावी, तसेच बस स्टँड परिसरातील अतिक्रमण करणाऱ्या सर्व गाड्या हटवण्याची मागणी केली आहे. याची दखल जव्हारच्या मुख्याधिकाऱ्यांनी घेतली असून अतिक्रमक हटवण्याची कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

हे ही वाचा

मराठी महिलेला जागा नाकारण्यावरून सेना-मनसेत चिखलफेक!

भुजबळांचे मुंबईत पुनर्वसन !

मंत्रालयातील प्रवेशाचा नियम, कुणाचा ‘वरचा मजला’ रिकामा? नोकरशाहीवर टीकेचा आसूड

तर सोमवारी कांदिवलीतही सिद्धार्थ किसन अंगुरे या मराठी युवकाला काही परप्रांतीय तरूणांनी अडवले आणि जय श्रीरामच्या घोषणा देण्याची जबरदस्ती केली. सिद्धार्थने घोषणा करण्यास नकार दिला म्हणून त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. सिद्धार्थवर कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

टीम लय भारी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

5 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

6 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

9 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

9 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

9 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

10 hours ago