मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्यावरून उठलेला वाद आता चांगलाच चिघळला आहे. मुलुंडमधील शिवसदन सोसायटीत ऑफिससाठी जागा शोधायला गेलेल्या तृप्ती देवरुखकर यांना मराठी असल्याचे कारण देऊन जागा नाकारण्यात आली होती. त्यांना आलेल्या त्या अनुभवाबद्दल फेसबुक आकाऊंटवर विडिओ पोस्ट करून सांगितले. त्यानंतर, प्रचंड व्हायरल झालेल्या या विडियोवरून वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून, राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करायला सुरुवात केली आहे. अश्यातच, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या वादात उडी घेतली आहे. सदर घटनेसाठी भाजप तसेच एकनाथ शिंदे यांना जबाबदर ठरवून, ‘हा माज कोठून आला. याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी द्यायला हवे’ अशा शब्दात संजय राऊत यांनी आगपाखड केली.
आपल्या ट्विटर आकाऊंटवरून संजय राऊत म्हणाले, “हा एवढा माज कोठून आला ? मुलुंड मध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्या पुरता हा विषय नाही.आणखी बरेच काही आहे. हा माज कोठून आला. याचे उत्तर एकनाथ शिंदे व त्यांच्या मींधे महा मंडळाने द्यायला हवे. भाजपने शिवसेना फोडली ती या मंडळींचा माज वाढवण्यासाठी.मराठी माणूस मिंधा करण्याचा हा डाव उधळला जाईल. जे म्हणतात आमचीच शिवसेना खरी ते उघडे पडले. तृप्ती देवरुखकर यांचे अश्रू वाया जाणार नाहीत. जय महाराष्ट्र!”
हा एवढा माज कोठून आला ?मुलुंड मध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्या पुरता हा विषय नाही.आणखी बरेच काही आहे.हा माज कोठून आला. याचे उत्तर एकनाथ शिंदे व त्यांच्या मींधे महा मंडळाने द्यायला हवे.भाजपने शिवसेना फोडली ती या मंडळींचा माज वाढवण्यासाठी.मराठी माणूस मिंधा करण्याचा हा डावउधळला…
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 28, 2023
एकीकडे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांवर या घटनेचे खापर फोडले आहे दुसरीकडे मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अश्या घटनांसाठी शिवसेनेला जबाबदार धरले आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करत 2019 विधानसभा निवडणुकांवेळी आदित्य ठाकरे यांच्या वरळी येथे लागलेल्या गुजराती भाषेतील बॅनर्स वरून टीका केली.
“केम छो वरळी “होर्डिंग लावणाऱ्या लोकांमुळेच ह्या लोकांना एवढा माज आणि हिम्मत आली आहे की महाराष्ट्रात मराठी माणसाला घर देणार नाही म्हटतात ह्यांचा माज उतरवल्या शिवाय राहणार नाही जय मनसे जय राज साहेब
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 28, 2023
आपल्या ट्विटर अकाऊंटवरुण सांदीप देशपणे म्हणाले, ” ‘केम छो वरळी’ होर्डिंग लावणाऱ्या लोकांमुळेच ह्या लोकांना एवढा माज आणि हिम्मत आली आहे की महाराष्ट्रात मराठी माणसाला घर देणार नाही म्हटतात ह्यांचा माज उतरवल्या शिवाय राहणार नाही जय मनसे जय राज साहेब”
परप्रांतीय मतांसाठी हुजरेगिरी करणाऱ्या राजकीय पक्षांनी लक्षात ठेवावे,आज ते मुंबईतील मराठी माणसाला सोसायटीत येऊ देत नाहीयेत…. उद्या मुंबईच्या राजकारणातून तुम्हाला कुठच्या कुठे फेकून देतील.
मुंबईतील मुलुंड येथे मराठी महिलेला घर नाकारणाऱ्या सोसायटी चेअरमनला मनसेने तात्काळ… pic.twitter.com/oCDAg7Ydda
— मनसे रिपोर्ट | MNS Report (@mnsreport9) September 27, 2023
मुलुंडमधील घटनेची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मुलुंडमधील शिवसदन सोसायटिला भेट दिली आणि संबंधित लोकांना मनसे स्टाइल जाब विचारला.
हे ही वाचा
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोला पहाटे २ वाजता नोटीस, ७२ तासांत प्लांट बंद करा
दीपक केसरकरांची अनोखी गणेश भक्ती; रात्रभर मुंबईत, दिवसा कोकणात!