राजकीय

रामराजे नाईक निंबाळकर एक पाऊल मागे…युतीधर्म पाळणार?

मागील दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेला माढा लोकसभा मतदारसंघाचा (Madha Lok Sabha ) तिढा आज सुटणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. झालेल्या बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना महायुतीचा काम करण्याचा शब्द दिल्यामुळे माढ्यातील राजकारणाला वेगळं वळण लागलं आहे. रामराजे नाईक निंबाळकर एक पाऊल मागे येणार आणि माढा मतदारसंघाचा तिढा सुटणार या चर्चेने राजकीय वर्तुळात उत आला आहे. (Ramraje Naik Nimbalkar Madha Lok Sabha Constituency Dispute )

माढा लोकसभा मतदार संघात महायुती कडून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहिर केली आहे. गेली 32 वर्षाहून अधिक काळ फलटण तालुक्यात रामराजे यांची एकहाती सत्ता आहे. तर साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात रामराजे यांना विशेष महत्व आहे. मात्र त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी व भाजपाचे माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करण्याची वेळ युती धर्मामुळे रामराजे यांच्यावर आली.

कुटुंबातील लढाईवर शरद पवारांच्या बहिणीचं मोठं वक्तव्य; कोणाची घेतली बाजू?

रामराजे नाईक निंबाळकर आपली नाराजी दूर करण्यासाठी मुंबईला अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. सोमवारी दिवसभर चर्चा न झाल्यामुळे मंगळवारी सकाळी रामराजे नाईक निंबाळकर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर देखील उपस्थित होते. माढा लोकसभा मतदारसंघासाठी संजीव राजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीचे उमेदवार असावेत अशा पद्धतीची मागणी होती.

त्यांनाही उमेदवारी न मिळाल्यामुळे ते देखील नाराज असल्याच्या बातम्या सुरू होत्या. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, रणजीत निंबाळकर आणि श्रीकांत भारतीय यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची यांची एकत्रित बैठक पार पडली.

रात्रीस खेळ चाले…राज ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची मध्यरात्री अज्ञात स्थळी भेट

ही बैठक अर्धा तास सुरु होती. या चर्चेनंतर अजित पवार देवगिरी निवासस्थानी निघून गेले. तत्पूर्वी रामराजे नाईक निंबाळकर देखील बाहेर पडले. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांना सोडण्यासाठी भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर देखील बाहेर आले होते. ही घडामोडी पाहता रामराजे नाईक निंबाळकर यांची नाराजी दूर झाल्याची सर्वत्र रंगली आहे.

धनश्री ओतारी

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

4 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

4 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

6 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

8 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

8 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

9 hours ago