राजकीय

बाटग्यांवरुन सामन्यातील राऊतांच्या अग्रलेखाला प्रत्युत्तर देत नितेश राणे म्हणाले…

टीम लय भारी

मुंबई:- शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून नाव न घेता रोख प्रामुख्याने नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र, पडळकर आणि प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी ‘बाटग्यांवरुन’ केलेला हल्लाबोल नितेश राणेंना चांगलाच झोंबला आहे. त्यांनी राऊतांना प्रत्त्युत्तर म्हणून ‘शिवसेनेच्या बाटग्यांची यादी!, असे म्हणत शिवसेनेमधल्या आयरामांची यादी प्रसिद्ध केली आहे (Sanjay Raut attack through Saamana then nitesh rane has replied).

भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केली होती. त्यांनी नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख प्रामुख्याने नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र, पडळकर आणि प्रसाद लाड यांच्याकडे होता. यावर आता नितेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

आम्हीही अशी थप्पड देऊ की समोरील व्यक्ती आपल्या पायांवर पुनः उभी राहू शकणार नाही’, उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांना फडणविसांचे पत्र, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केल्या 26 तातडीच्या आणि दीर्घकालीन मागण्या

नितेश राणे यांनी ट्विटमधून संजय राऊतांना उत्तर दिले आहे. शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे. पण थोडी माहितीसाठी, असे म्हणत त्यांनी शिवसेनेतील आयारामांची काही नावे सांगितली आहेत.
सचिन आहीर – bks ची जबाबदारी
राहुल कनाल – शिर्डी संस्था
आदेश बांदेकर – सिद्धिविनायक संस्था
उदय सामंत – कॅबिनेट मंत्री
अब्दुल सत्तार – मंत्री
प्रियांका चतुर्वेदी – खासदार

नितेश राणे यांनी दुसरे ट्विट संजय राऊतांना टॅग करत केले आहे. डाके..रावते..रामदास कदम..शिवतारे..राजन साळवी, सुनील शिंदे दिसणार नाहीत सारखे जुने सैनिक दिसणार नाहीत..स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषण द्यायची!! असे ट्विट करत नितेश राणे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

राऊत अग्रलेखात काय म्हटले होते?

भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे (Sanjay Raut said that there was a generation of pro-Hindu ideologues in this party).

संजय राऊत आणि नितेश राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ

BJP can never think of attacking Shiv Sena Bhavan: Shiv Sena MP Sanjay Raut, slams Prasad Lad’s remark

शिवसेनेच्या स्थापनेपासून सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला असेल तर तो आपल्यातल्याच बाटग्यांनी. बाटगा जरा जोरातच बांग देतो व आपणच कसे कडक निष्ठावान आहोत यासाठी लक्ष वेधून घेत असतो. प्रसंगी तो जिभेवाटे गटारही मोकळे करून सर्वत्र दुर्गंधी पसरवतो. या दुर्गंधीमुळे आज कमळाचे पावित्र्य व मांगल्य साफ कोमेजून गेले आहे.

1992 च्या ‘बाबरी’ दंगलीत हेच शिवसेना भवन हिंदुत्वाच्या स्वाभिमानाने खंबीरपणे मराठी व हिंदूंचे रक्षणकर्ते म्हणून उभे होते. तेव्हा आजचे हे बाटगे दंगलखोर पाकड्यांना घाबरुन घरातच गोधड्या भिजवत होते. आम्ही बाबरी पाडली नाही हो, असा आक्रोश करून बाबरास पाठ दाखवून पळणारे आज या बाटग्यांच्या जीवावर शिवसेनेशी ‘सामना’ करु पाहतात ही आडवाणी – अटलबिहारींच्या महान पक्षाची घसरगुंडी आणि शोकांतिका नाहीतर काय? असे संजय राऊत यांनी अग्रलेखात लिहिले आहे (Sanjay Raut says Advani – Atal Bihari what if not the collapse and tragedy of great party).

Sagar Gaikwad

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

13 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

15 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

16 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

17 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

17 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

18 hours ago