शाह काय म्हणाले होते?
महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली जात होती. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. राज्यांनीही दर कमी करावेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. मात्र महाविकास आघाडीने पेट्रोल-डिझेलऐवजी मद्य स्वस्त केले. याचा जाब कार्यकर्त्यांनी विचारावा, असे शाह यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं होतं.
या बद्दल राऊतांनी व्यक्त केला संताप
दिल्लीत आज पुन्हा सोनिया, पवार, राऊतांची बैठक, नेमका अजेंडा काय?
“पेट्रोल-डिझेलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर…”
इंधनाच्या दरामध्ये कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला नाही. महाराष्ट्र सरकारने इंधनदर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला नाही यासंदर्भातील शाह यांच्या टीकेवरुन प्रश्न विचारण्यात आला असता दर कमी करण्याचा निर्णय पोटनिवडणुकीमधील पराभवानंतर घेण्यात आल्याचं म्हटलं. “दीडशे रुपये वाढवायचे आणि चार रुपये कमी करायचे. पोट निवडणुकींमध्ये पराभव झाल्यानंतर पुढल्या निवडणुकीमध्ये पराभव होऊ नये म्हणून दर कमी केले,” असं राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “पेट्रोल-डिझेलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर या देशात भारतीय जनता पार्टीचा पराभव करावा लागेल,” असंही राऊत म्हणाले.
भाजपाने केली होती दरकपातीची मागणी…
केंद्र सरकारने तीन नोव्हेंबर रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर पाच रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी केले होते. दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमधून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्राने केल्याचा प्रचार भाजपाकडून करण्यात आला होता. केंद्र सरकारने इंधन दरात कपात केल्यानंतर राज्यातही महाविकास आघाडी सरकारने दरात कपात करावी, अशी मागणी महाराष्ट्र भाजपाने केली होती.
संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा, भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप
‘Check for correct usage’: Sanjay Raut tells Maharashtra BJP over UP CM Yogi’s comment on camera
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…