मनोरंजन

‘बजरंगी भाईजान’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सलमान खानने दिले संकेत

टीम लय भारी

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याच्या कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपटात काम केले आहे. ‘बजरंगी भाईजान’ हा सलमानच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. दरम्यान लवकरच ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. विशेष म्हणजे सलमान खानने स्वत: याबाबतचे संकेत दिले आहेत(Bajrangi Bhaijaan will be released soon).

येत्या ७ जानेवारीला देशभरातील चित्रपटगृहात ‘RRR’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सलमान खान, करण जोहर, आलिया भट्ट, ज्युनियर एनटीआर, रामचरण आणि एस. एस. राजामौली उपस्थित होते. या कार्यक्रमात सलमान खानने ‘बजरंगी भाईजान’चा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा केली.

मिस युनिव्हर्स-2021 हरनाज संधू मुंबईत पोहोचली, महिलांसाठी पर्यावरणाबाबत दिले हे वक्तव्य

Attack : जानेवारीत होणार ‘अटॅक’! जॉन अब्राहमच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे टिझर रिलीज

 यावेळी सलमान म्हणाला, एस. एस. राजामौली यांचे वडील आणि प्रसिद्ध लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाची कथा लिहिली. हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या कथेपैकी एक आहे. दरम्यान नुकतंच विजयेंद्र प्रसाद यांनी ‘बजरंगी भाईजान’चा सिक्वेल लिहिण्याचे काम पूर्ण झाले आहे. यावेळी करण जोहरने सलमानला विचारले, म्हणजे या ठिकाणी ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करतोस का? त्यावर सलमान ‘हो’ असे उत्तर दिले.

भेटवस्तूंवर टॅक्स लागतो? जाणून घ्या काय सांगतो कायदा

It’s massive! Salman Khan announces Bajrangi Bhaijaan 2, SS Rajamouli’s father to write the sequel

 दरम्यान २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिकची कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा गल्ला जमवला होता. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खानशिवाय हर्षाली मल्होत्रा, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते.

Team Lay Bhari

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

9 hours ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

9 hours ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

9 hours ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

9 hours ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

10 hours ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

10 hours ago