राजकीय

‘डुकराशी कुस्ती नको’ या फडणवीसांच्या ट्विटवर संजय राऊतांचा हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई : ड्रग्ज पेडलर व अंडरवर्ल्डशी संबंधांवरून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. नवाब मलिक यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर नवे आरोप केले होते. त्याला फडणवीस यांनी जॉर्ज बर्नाड शॉचं वाक्य ट्विट करून प्रतिक्रिया दिली होती. फडणवीसांच्या या ट्वीटनंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केलं आहे(Sanjay Raut’s attack on Fadnavis’ tweet).

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी ‘एनसीबी’चे अधिकारी समीर वानखेडे यांची पोलखोल करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून आरोप करताना व त्याचे पुरावे ट्वीट करताना नवाब मलिक रोज एखादा ‘शेर’ ट्विट करायचे. नंतर फडणवीस यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली असतानाही मलिक यांनी हीच शेरोशायरी सुरू ठेवली होती.

संजय राऊतांनी देशात पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांवर सामनातून केली टीका

बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत : संजय राऊत

काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत मलिक यांनी फडणवीस यांच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचे काही दाखले दिले. त्याचबरोबर, त्यांनी फडणवीसांवर राजकारणाचं गुन्हेगारीकरण व बनावट नोटांच्या रॅकेटला संरक्षण दिल्याचाही आरोप केला. मलिक यांच्या या आरोपांमुळं खळबळ उडाली होती. फडणवीस त्यावर काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, त्यांनी शॉ यांच्या इंग्रजी ओळी ट्विट केल्या. ‘फार पूर्वी मी शिकलो होतो, डुकराशी कधीही कुस्ती खेळू नका. त्यामुळं आपल्या अंगावर घाण उडते, याउलट डुकराला मजा येते’, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

पंजाबमधील राजकीय गोंधळामागे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा सहभाग; शिवसेनेचा हल्लाबोल

NCP Leader’s Allegations Due To Anger But Slugfest Should End: Sena’s Sanjay Raut

कीर्ती घाग

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

10 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

10 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

11 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

11 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

17 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

18 hours ago