31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांनी देशात पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांवर सामनातून केली टीका

संजय राऊतांनी देशात पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांवर सामनातून केली टीका

टीम लय भारी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी अमेरिकेत जाऊन धर्मांधता, दहशहतवाद, फुटीरतावाद या विषयांवर जोरदार भाषणे केली होती. या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोदींचे कौतुक केलेच, परंतु आपल्याच देशात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ चे नारे दिले जातात यास काय म्हणावे? असे म्हणत राऊत यांनी सामनातून टीका केली आहे (Sanjay Raut criticized from editorial page of ‘Samna’)

मोदी, योगींसारखे प्रखर राष्ट्रभक्त हिंदुत्ववादी नेते राज्यात आणि देशात आहेत, याचा विसर ‘पाकिस्तान जिंदाबादचे’ नारे देणाऱ्यांना पडला आहे. त्याचबरोबर निवडणूक काळात हिंदू-मुसलमान, हिंदुस्थान-पाकिस्तान अशा शिळ्या कढीस ऊत आणून धार्मिक तणाव वाढावा. यासारखे कारस्थान नेहमी रचले जात आहे. असे सामन्यात म्हण्यात आले आहे.

Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

Sanjay Raut : ईडीचा नवा खुलासा:प्रवीण राउत-संजय राउत यांच्या पत्नी पार्टनर! वर्षा राउत यांना 55 लाखांचे बिनव्याजी कर्जही दिले, ED चा गंभीर आरोप

त्याचबरोबर मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी देशाचे संविधान पाळूनच आपले मार्ग बनवले पाहिजेत. असे सांगण्याची हिमंत जेव्हा असुरुद्दीन ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी त्यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल. नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल, असे विधान सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे.

चोरटयांनी चोरले चक्क शाळेतील टीव्ही

Want to take power in Delhi, see Uddhav as PM, says Raut

त्याचबरोबर ओवेसी हे राष्ट्रभक्तच आहेत. बॅ. जिना यांच्याप्रमाणेच ते उच्चशिक्षित, कायदेपंडित आहेत. परंतु, त्याच जिना यांनी राष्ट्रभक्तीचा बुरखा पांघरून ‘पाकिस्तान जिंदाबाद’ चा नारा दिला होता. तसेच आज ओवेसींच्या सभांमधून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ चे नारे उठत आहेत. या मागे राजकीय सूत्र आहेत, फोडा, झोडा आणि विजय मिळवा. ओवेसींना त्याच विजयाचे सूत्रधार म्हणून वापरले जात आहे. असे सामनामध्ये म्हण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी