राजकीय

सुजय विखेंच्या पावलावर सत्यजित तांबेंचे पाऊल; राधाकृष्ण विखेंची सूचक प्रतिक्रिया

नाशिक पदवीधर निवडणुकीतून सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवीत आहेत. शेवटच्या क्षणाला निवडणुकीतून माघार घेत डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसला (Congress) अनपेक्षित धक्का दिल्यांनतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. तांबे यांचा हा घाव काँग्रेसच्या चांगलाच वर्मी लागला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष कोणाला पाठिंबा देणार हे अद्यापही गुलदस्त्यातच होते. पण आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radahkrushna Vikjhe-Patil) यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सुजय विखेंप्रमाणे सत्यजित तांबेही लवकरच बाहेर पडतील असे मला वाटते, असे विधान विखेंनी केले आहे. त्यामुळे सत्यजित तांबेंना (Satyjit Tambe) भाजपचा पाठिंबा मिळणार असे स्पस्ट संकेत मिळत आहेत. (Satyajit Tambe on the way to BJP; Statement of Radhakrishna Vikhe Patil)

बीड येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी विमानतळावर आले असताना राधाकृष्ण विखे-पाटील आणि फडणवीस यांच्यात काही काळ चर्चा झाली. त्यानंतर लगेच प्रसारमाध्यमांशी बोलताना विखेंनी आपली भूमिका जाहीर केली. हा घटनाक्रम लक्षात घेतल्यास सत्यजित तांबे हेच आता भाजपचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी विखे-पाटलांनी काँग्रेस नेतृत्वावर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले,” भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी नव्हे, तर राहुल गांधींसाठी काढण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महाराष्ट्रातसुद्धा काँग्रेसची अशीच अवस्था आहे.”

हे सुद्धा वाचा

मला निलंबित करून काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला; सुधीर तांबेंना काँग्रेसचा दणका

आम्हीही मातोश्रीवर खोकेच पोहोचवले आहेत..!

VIDEO : सत्यजित तांबेनी काँग्रेसला फसविले : नरेंद्र वाबळे, अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ

 

थोरातांनी काँग्रेससाठी संगमनेरमध्ये सभा घ्यावी
राधाकृष्ण विखे-पाटील यांना काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता विखे-पाटील म्हणाले की, याबाबत निष्ठेचे धडे देणाऱ्या बाळासाहेब थोरातांनीच स्पष्टीकरण दिले पाहिजे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराची जाहीर सभा बाळासाहेब थोरातांनी संगमनेरमध्येच घेतली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला पक्षाच्या विचारांशी बांधिलकी राहिली नसून त्याविरोधात पक्ष काम करीत असल्याचा आरोप विखे पाटलांनी यावेळी केला.

‘काँग्रेस छोडो’मुळेच पक्षाची अधोगती
यावेळी काँग्रेसच्या कार्यशैलीवर तोंडसुख घेताना विखे पाटील म्हणाले, भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी नव्हे, तर केवळ राहुल गांधींची प्रतिमा सुधारण्यासाठी काढण्यात आली. काँग्रेसमधून युवकवर्ग मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. त्यामुळे ‘भारत जोडो’पेक्षा ‘काँग्रेस छोडो’ हा कार्यक्रम वेगात सुरु असल्यामुळेच पक्षाची अधोगती होत आहे.”

टीम लय भारी

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

12 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

13 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

13 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

14 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

14 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

16 hours ago