33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeराजकीयमला निलंबित करून काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला; सुधीर तांबेंना काँग्रेसचा दणका

मला निलंबित करून काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला; सुधीर तांबेंना काँग्रेसचा दणका

नाशिक पदवीधर मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज देऊनही एबी फॉर्म न भरून काँग्रेसलाच चकवा देणाऱ्या डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना दणका बसला असून त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात निलंबन करण्यात आले आहे. पक्षश्रेष्ठींचा आदेश झुगारल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची (Suspension) कारवाई केली आहे. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आल्याचे काँग्रेसने (Congress) प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे. मात्र, पक्षाची ही भूमिका न्यायाला धरून नसल्याचे तांबे यांनी म्हंटले आहे. त्यामुळे आता सुधीर तांबे कोणती खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Expulsion of Sudhir Tambe; said Party did me injustice)

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काहीच तास शिल्लक असताना काँग्रेसला गाफील ठेवत सुधीर तांबे यांनी त्यांचा मुलगा सत्यजित तांबे (Satyjeet Tambe) यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली. सुधीर तांबे यांच्या या डावपेचांनी नाराज झालेल्या पक्षश्रेष्ठींनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली असून त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत तांबे दोषी ठरल्यास काँग्रेसकडून त्यांची हकालपट्टी होणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, सुधीर तांबे यांनी पक्षाने घेतलेली भूमिका योग्य नसल्याचे सांगत पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याची भावना ट्विटरवर व्यक्त केली आहे. ते म्हणाले,” न्यायावर माझा विश्वास आहे. चौकशीअंती सत्य लोकांसमोर येईल. काँग्रेसने माझ्याविरोधात घेतलेली भूमिका न्यायला धरून नाही.”

हे सुद्धा वाचा

आम्हीही मातोश्रीवर खोकेच पोहोचवले आहेत..!

जा आणि आधी भारतीय संस्कृती शिका!

VIDEO : सत्यजित तांबेनी काँग्रेसला फसविले : नरेंद्र वाबळे, अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ

तांबेंच्या धोबीपछाडने काँग्रेसची नाचक्की
सुधीर तांबे यांच्या अनपेक्षित खेळीने पक्षाचा अधिकृत उमेदवारच रिंगणात न उतरल्यामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार असून तांबेंच्या या डावपेचामुळे काँग्रेसची पंचाईत झाली आहे. त्यामुळे आता नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा
सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवीत आहेत. मात्र, सुधीर तांबे यांच्या खेळीने घायाळ झालेल्या काँग्रेसने सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सत्यजित यांना पाठिंबा देणार नसल्याचे त्वरित जाहीर केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी