राजकीय

शिंदे-फडणवीसांची ‘सावरकर गौरवयात्रा’ म्हणजे ‘अदानी बचाओ यात्रा’; राऊतांचा निशाणा

‘वीर सावरकर गौरवयात्रा’ हे नाव असलं तरी ती अदानी बचाओ यात्रा आहे. गौतम अदानींच्या प्रकरणावरील महाराष्ट्राच लक्ष विचलीत व्हावं यासाठी सावरकरांच्या मुखवट्याखाली अदानी गौरव यात्रा काढत आहेत,’ अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेच्या वीर सावरकर गौरव यात्रेवर केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानाविरोधात राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांत ‘वीर सावरकर गौरवयात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या यात्रेवरून आज खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, वीर सावरकर गौरव यात्रेसंदर्भात घोषणा करताना मुख्यमंत्री सावरकरांबद्दल दोन वाक्य उत्फूर्तपणे बोलू शकत नव्हते. एक कागद समोर होता तो वाचून दाखवत होते. ज्यांच्या हृदयामध्ये सावरकर आहेत, त्यांनी सावरकरांना मानवंदना द्यायला पाहिजे होती. पण ते वाचू का हेही विचारतात, यालाच गुलामी म्हणतात. या गुलामी विरोधात सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात आयुष्य घालवलं, हे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी समजून घेतल पाहिजे.

संबंधित व्हिडिओ क्लिप: मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले हे वाचू का?

सावरकर गौरव यात्रा हे नाव असलं तरी ती अदानी बचाओ यात्रा आहे. गौतम अदानींच्या प्रकरणावरील लक्ष विचलीत व्हाव यासाठी ही यात्रा काढली जात आहे. सावरकर महान क्रांतीकारक होते, त्यांच्याबदल आदर आहे. त्यामुळे ढोंग्यांनी आम्हाला वीर सावरकर सांगण्याचा प्रयत्न करू नये. शिवाजी पार्कच्या बाजूला सावरकरांचे स्मारक उभारण्यात बाळासाहेबांचे योगदान आहे. सावरकरांचे हिंदूत्व आम्ही स्विकारले आहे. आमचं हिंदूत्व विज्ञानवादी आहे. आम्ही सावरकर जगलोय आणि जगतोय. भारतीय जनता पक्ष म्हणजे सावरकर नाहीत. त्यांनी यात्रा काढणे ही सावरकरांची सर्वात मोठी बदनामी आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

सोमवारी दिल्लीत आमची भूमिका स्पष्ट केली आहे. सावरकर आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यांना धक्का लावता येणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होईल आणि दिल्लीत सुद्धा 2024 ला बदल होईल. शिवसेना महाविकास आघाडीसोबत आहे त्यामुळे बदल होईल, अशी त्यांना भीती वाटते असेही राऊत यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा :

अजूनही सुपर सीएम फडणवीस सांगे तैसाच सीएम शिंदे बोले!

सावरकर गौरव यात्रा अन् राहुल गांधींचा निषेध – एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

राज्यात ‘मुका घ्या मुका’ सिनेमा चालू आहे; संजय राऊतांचा खोचक टोला

वीर सावरकर गौरवयात्रा कशासाठी?

सावरकर यांनी स्वातंत्र्य आंदोलनाव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रांत अत्यंत मोलाचे योगदान दिले. जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, मराठी भाषेचा गौरव, मराठी भाषेला अनेक शब्द देण्याचे काम अशा कितीतरी क्षेत्रांत त्यांनी योगदान दिले आहे. प्रत्येक देशवासी त्यांच्या अतुलनीय योगदानाचा ऋणी आहे.  देश आणि विशेषत: महाराष्ट्र त्यांचे योगदान कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचे दैवत असलेल्या सावरकर यांचा राहुल गांधी यांनी केलेल्या अपमानाविरोधात राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांत ‘वीर सावरकर गौरवयात्रा’ काढण्यात येतील आणि ठिकठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध करण्यात येणार असल्याचेही शिंदे आणि फडणवीस यांनी सांगितले.

Team Lay Bhari

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

6 hours ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

6 hours ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

6 hours ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

6 hours ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

7 hours ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

7 hours ago