राजकीय

Sharad Pawar : ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्याची गरज, शरद पवारांचा सूचक इशारा

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारून भाजपशी हात मिळवणी केली आणि राज्यात नवी सत्ता स्थापन केली. या सत्तांतराच्या नाट्यावर अनेकजणांनी तीव्र नाराजी दर्शवली, परंतु त्याचा शिंदे गटावर फारसा फरक पडल्याचे दिसून आले नाही त्याउलट भाजपच्या मांडीला मांडी लावून आनंदाने ते म्हणतील तसे वागण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे, दरम्यान या संपुर्ण परिस्थितीवर भाष्य करीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे शहरात आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, त्यावेळी त्यांनी ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे सूचक वक्तव्य केले.

शरद पवार यांची ठाणे शहरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर राज्यात चालू असणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींचा त्यांनी आढावाच यावेळी घेतला. माध्यमांशी बोलताना त्यांनी केवळ राज्य सरकारवरच नव्हे तर केंद्र सरकारवर सुद्धा सडकून टीका केली आहे, जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले असे म्हणून टोला सुद्धा लगावला आहे. केंद्रातील भाजप सरकारने देशवासीयांना दिलेली अनेक आश्वासने पाळली नसल्याचे लक्षात आणून देत आपण लवकरच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दौरा करून तेथील आढावा घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘माणसं फोडणं, साधनांचा वापर करणं आणि ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गंभीर चित्र या देशासमोर आज दिसत आहे. त्यामुळे देशातील बिगरभाजप पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद साधून लोकशाही मार्गाने आलेली सरकारं पाडण्याचं जे कृत्य सुरू आहे त्याविरोधात जनमत तयार करण्यासाठी लढा उभा करण्याचा आम्ही विचार करत आहोत,’ असे म्हणून शरद पवार यांनी राजकीय रिंगणात पुन्हा रणशिंग फुंकले आहे.

हे सुद्धा वाचा…

Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह थेट पोहोचला पोलिस स्टेशनमध्ये

VIDEO : ‘फेटेवाले बाप्पा’

Bhaucha Dhakka : मुंबईतील प्रसिद्ध भाऊच्या धक्क्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढे शरद पवार म्हणतात,  ‘मी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेणार आहे. ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे,’ असं शरद पवार यांनी यावेळी सूचक इशाराच दिला आहे. त्यामुळे येत्या काळात राजकीय चित्र बदलण्यासाठी शरद पवार कोणती रणनीती आखणार, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना धडा शिकवणार का, उद्धव ठाकरे यांच्यासोबत येऊन पुन्हा सत्ता स्थापनेता विचार होणार का, भाजपला नमवण्यासाठी राष्ट्रवादी मोठ्या ताकदीने चाल करेल का असे एक ना अनेक प्रश्न या शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने समोर येऊ लागले आहेत.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

2 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

3 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

3 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

3 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

3 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

7 hours ago