28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमनोरंजनRanveer Singh : अभिनेता रणवीर सिंह थेट पोहोचला पोलिस स्टेशनमध्ये

Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह थेट पोहोचला पोलिस स्टेशनमध्ये

अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या हटके लूकमुळे कायमच चर्चेत असतो. इतरांपेक्षा थोडी वेगळीच स्टाईल करीत तो सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो, अभिनयात सुद्धा दमदार परफाॅर्मन्सेस करीत तो प्रत्येकालाच आपलंसं करतो, परंतु गेल्या काही दिवसांपासून हा गुणी कलाकार चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंहने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते, त्याप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनंतर रणवीस सिंहवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अंतर्गत त्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले, त्यानुसार रणवीर सिंहने आज आपल्या लीगल टीमसह चौकशीसाठी हजेरी लावली.

एका मासिकासाछी रणवीर सिंह याने न्यूड फोटो शूट केले आणि तेच फोटो एका पेजने सोशल मीडियावर सुद्धा अपलोड केले. दरम्यान हे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले, या फोटोला कोणी समर्थन दिले तर कोणी यावर विरोध दर्शवत थेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. तक्रार नोंदवल्यानंतर चेंबूर पोलिसांनी रणवीर विरोधात भादंवि कलम 292, 293, 509 च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या संपुर्ण प्रकरणी पोलिसांनी आता रणवीरचा जबाब नोंदवला आहे.

न्यूड फोटो शूट केल्याप्रकरणी रणवीर सिंह याच्यावर आक्षेप घेत चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि याप्रकरणी चौकशीचे आदेश काढत 22 ऑगस्ट रोजी पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले. दरम्यान कामात व्यस्थ  असल्याचे कारण सांगून रणवीर सिंहने दोन आठवड्यांची मुदतवाढ चेंबूर पोलिसांकडून मागून घेतली. त्यानंतर आज रणवीर सिंहने आपल्या लीगल टीमसह पोलिस ठाण्यात हजेरी लावली आणि जवाब नोंदवला. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर रणवीर सिंहला सोडण्यात आले, यावेळी पुढे सुद्धा पोलिस चौकशीसाठी सहकार्य करावे असे त्याला यावेळी बजावण्यात आले.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : ‘फेटेवाले बाप्पा’

Bhaucha Dhakka : मुंबईतील प्रसिद्ध भाऊच्या धक्क्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Sushmita Sen : सुष्मिता सेन पुन्हा झाली ‘ट्रोल’, कारण ऐकून व्हाल थक्क

ज्या फोटोमुळे रणवीरच्या अडचणी वाढल्या ते न्यूड फोटोशूट रणवीरने ‘बर्ट रेनॉल्ड’च्या पेपर मासिकासाठी केले होते. त्यानंतर हे फोटो ‘डाएट सब्या’ नावाच्या एका अधिकृत इस्टाग्रामवरून शेअर करण्यात आले आणि या फोटोसोबत रणवीरच्या मुलाखतीतील काही वाक्ये जोडण्यात आली. त्यामध्ये रणवीर सिंह असे म्हणतो की, “मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. मला चांगले कपडे घालायला, छान छान खायला आवडतं. मी दिवसातील 20 तास काम करतो पण कधीच याबाबत तक्रार करत नाही. मी या सर्व गोष्टींसाठी फार आभारी आणि कृतज्ञ आहे. मात्र यासाठी मला फार कष्ट घ्यावे लागलेत. मी आज ‘गुची’ सारख्या ब्रॅण्डचे कपडे घेऊन डोक्यापासून पायापर्यंत सर्व काही ब्रॅण्डेड वापरु शकतो. तरीही यावरुन कोणी माझ्याबद्दल उलटसुटल बोलत असेल तर त्याची मी पर्वा करत नाही,”  असे म्हणून रणवीरने त्यांच्या फ्री स्टाईलचे वैशिष्ट्य शेअर केले होते.

दरम्यान, रणवीर सिंहची हीच हटके स्टाईल त्याला भारी पडली का असा सवाल आता विचारण्यात येऊ लागला आहे. रणवीर सिंहच्या या फोटोशूटचे कौतुक करणाऱ्यांचा सुद्धा मोठा वर्ग आहे, परंतु सोशल मीडियावरच असे दोन गट पडल्याने रणवीरच्या अडचणी वाढू लागल्या आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी