राजकीय

शिवसेनेचा राज्यपालांवर हल्लाबोल, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजप प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे वागतायत

टीम लय भारी

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जुन्या पक्षाच्या मिठास जागून महाविकासआघाडीच्या दुधात मिठाचा खडा टाकत आहेत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे वागत आहेत, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपाल कोश्यारी अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले. त्यांनी जय हिंद किंवा जय महाराष्ट्रही म्हटले नाही. राष्ट्रगीत होईपर्यंतही राज्याचे घटनात्मक प्रमुख थांबले नाहीत.( Shiv Sena attacks Governor)

यापूर्वी अनेक राज्यांच्या विधानसभेत राज्यपालांच्या भाषणादरम्यान अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्यामुळे कोणतेही राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून गेले नव्हते. परंतु, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पायंडा पाडला आहे. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे नाट्य घडवण्यात आले त्याची संहिता भाजप भाजप कार्यालयात लिहली गेली आणि त्या नाट्याचे महानायक हे राज्यपाल होते हे आता स्पष्टच झाले आहे, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त म्हटले आहे.

या सगळ्या प्रकारात राज्यपालांनी स्वत:चे पुरते वस्त्रहरण करून घेतले आहे. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष जे बार उडवत आहे, ते फुसकेच ठरत आहेत. राज्य बहुमतावर चालते व सरकारकडे १७० आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला जनादेश नाही व ते घालवायला हवे, असे कारस्थान कोणाच्या भरवशावर चालले आहे, असा सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांची मोदींवर खोचक टीका, अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येत आहेत

राज्यपाल कोश्यारींचा सोलापुर दौरा शिवभक्ताकडून रोखण्याचा इशारा

रोहित पवार यांचे राज्यपालांना सणसणीत प्रतिउत्तर

Maharashtra governor’s comment on Savitribai Phule sparks row, Congress slams ‘Sangh mentality’

भाजपला दाऊदच्या नावाने राजकारण करायचे आहे. त्यासाठी विधिमंडळात घटनेचा बळी देण्यात आला. राज्यपालांनी त्यास साथ द्यावी, हे देशाचे दुर्दैव आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल गोंधळी विरोधी पक्षाचे नेतृत्त्व करतात. तसेच शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करून निघून जातात. सत्ता गेली याचा इतका राग इतिहासात कोणी केला नसेल, अशी टीकाही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.राज्यपाल सभागृहात आले आणि निघून गेले.


अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना सुनावल्याची माहिती समोर येत आहे. राज्यपालांनी गेल्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले पत्र आणि अभिभाषणातील गोंधळाच्या मुद्द्यावरून महाविकासआघाडीच्या मंत्र्यांसमोर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. माझे अभिभाषण सुरू असताना तुमच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा दिल्या, असे राज्यपालांनी म्हटले.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

55 mins ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

1 hour ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

2 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

2 hours ago

पालिका कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने खून करून गाेदापात्रात फेकले, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पंचवटीतील एका महापालिका कर्मचाऱ्याची (NMC employee) तीक्ष्ण हत्याराने वार करून…

2 hours ago

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था…

3 hours ago