27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूजराज्यपाल कोश्यारींचा सोलापुर दौरा शिवभक्ताकडून रोखण्याचा इशारा

राज्यपाल कोश्यारींचा सोलापुर दौरा शिवभक्ताकडून रोखण्याचा इशारा

टीम लय भारी

सोलापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे ”चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल ? आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, हे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात रविवारी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.(Governor Koshyar’s warning to stop Solapur tour from Shiva devotees)

कोश्यारी यांनी केलेल्या विधानावर राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे, इतकेच न्हवते ठिकठिकाणचे शिवभक्त देखील आक्रमक झाले आहे. सोलापुरात ४ मार्चला राज्यपालांचा दौरा आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शिवभक्तांनी राज्यपालांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कोश्यारींनी माफी मागावी, अन्यथा त्यांचा दौरा रोखणार असल्याचा इशारा येथील शिवभक्तांनी दिला आहे.

”कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या विधानाची माफी मागवी. अन्यथा 4 तारखेला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. विमानतळाबाहेर वीस ते पंचवीस हजार शिवप्रेमी उपस्थितीत आंदोलन करतील,” असा इशाराही शिवप्रेमींनी दिला आहे. शिवप्रेमींसोबतच विविध पक्षाचे पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.

सोबतच मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांनीही राज्यपालांवर निशाणा साधला आहे. ”राज्यपालांनी नविन जावईशोध लावला. पदावर आहात, ज्येष्ठ आहात म्हणून मुलाहिजा करतो. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात नाक खुपसू नये, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

रोहित पवार यांचे राज्यपालांना सणसणीत प्रतिउत्तर

सेवानिवृत्त अधिका-यांच्या नेमणूक रद्द न करता राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केलेले लक्ष्य

राज्यपालांच्या हस्ते या उद्योजकांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार प्रदान

Explained: The controversy over Maharashtra Governor’s remark on Shivaji Maharaj

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी