राजकीय

दिशा सालियन प्रकरणावरुन शिवसेनेचा राणे, पाटीलवर हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई: सध्या राज्यात दिशा सालियन प्रकरणावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात पुन्हा वाद रंगताना दिसत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरु असताना दिशाच्याआई वडिलांनी बुधवारी राज्य महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.(Shiv Sena’s attack on Rane-Patil over Disha Salian case)

 आपल्या मुलीची बाजू मांडत मुलीची बदनामी राजकारण्यांनी थांबवावी अशी मागणी केली आहे. भाजप व शिवसेना यांच्यात पुन्हा नवा वाद सुरू झाला असता, आज शिवसेनेनं या प्रकरणावर आपली भूमिका सामनाच्या अग्रलेखातून स्पष्ट केलीय.

खून आणि बलात्कार यावर भारतीय जनता पक्षाचे लोक अलीकडे बरेच मुद्दे मांडतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याकामी पुढाकार घेतला असून मृत महिलांची अशी तुच्छ बदनामी त्यांनी सुरू केली आहे. दिशा सालियन या तरुणीची आत्महत्या सगळय़ांनाच अस्वस्थ करून गेली.

दिशा सालियन तिच्या मित्राबरोबर एका पार्टीत होती. त्यानंतर तिने गॅलरीतून स्वतःला झोकून दिले व आत्महत्या केली. असे समोर आले होते. मात्र दिशाच्या आत्महत्येचा संबंध सुशांतसिंह राजपूत प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न झाला. त्याबाबत अनेक तर्र वितर्क काढण्यात आले. तरीही या सर्व प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस व सीबीआयने केला. त्यातून सर्व आरोप व संशयांना उत्तरे मिळाली. मात्र दिशा सालियनवर मृत्यूपूर्वी बलात्कार झाला असेही काही राजकीय लोक म्हणाली. पण पोस्टमार्टेम रिपोर्ट तसे सांगत नाही, तरीही भाजपचे पुढारी त्यांच्या मनास येईल तसे बरळत आहेत व या मुलींची मृत्यूनंतरही बदनामी करीत आहेत. केंद्रीय मंत्रीपदावरील व्यक्ती असलेल्याने तरी हे भान राखायला हवे. चंद्रकांत पाटलांच्या बाबतीत ही अपेक्षा ठेवता येणार नाही. या लोकांना भस्म्यारोग जडला आहे, त्यामुळे दिशा सालियनच्या आई-वडिलांना जगणे कठीण झाले आहे, असं शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

शिवसेनचा धक्का, नितेश राणेंच्या हातून देवगडमधून गेली सत्ता

भाजपाला वरातीत नाचायला व दुःखात रडायला भाडोत्री लोक लागतात; शिवसेनेचा राणेंवर हल्लाबोल

Ulhasnagar: Two Shiv Sena members attacked while returning from last rites of party corporator

राणे-पाटलांच्या घाणेरड्या वक्तव्यांनंतर दिशाच्या माता-पित्यांनी प्रथमच मीडियासमोर येऊन सांगितले की, माझ्या मुलीबाबतचे हे घाणेरडे राजकारण थांबवा. आम्ही आमची एकुलती एक मुलगी गमावली आहे. आता मृत्यूनंतर तरी तिची अशी बदनामी करू नका.

शिवसेनेने लेखाच्या शेवटी, सत्तेच्या खुर्च्या उबवून ज्यांच्या शरीरात अहंकाराची गरमी वाढली आहे, त्यांच्या संवेदना मरण पावल्यानेच ते दिशा सालियनची मृत्यूनंतर बदनामी करीत आहेत. हे निव्वड घाणेरडे आणि खालच्या दर्जाचे राजकारण आहे असे म्हंटले जात आहे.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

11 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

12 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

12 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

13 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

15 hours ago

Prithviraj Chavan Vs Atul Bhosle | सरकारने काळजी घेतली तर तरूण मुलंही म्हशी पाळतील

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(If the…

15 hours ago