31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयशिवसेनचा धक्का, नितेश राणेंच्या हातून देवगडमधून गेली सत्ता

शिवसेनचा धक्का, नितेश राणेंच्या हातून देवगडमधून गेली सत्ता

टीम लय भारी

 देवगड: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांना धक्का देणारा निकाल समोर आलाय. देवगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये नितेश राणेंच्या हातून सत्ता गेलीय. देवगड नगरपंचायत मध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.( Shiv Sena’s power passed through Devgad through Nitesh Rane)

 भाजपाची सत्ता असणाऱ्या या नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला आठ व भाजपाला आठ अशा समसमान जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी आठ उमेदवार निवडून आले आहेत.

हे सुद्धा वाचा

मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला

काही उद्योजकांची संपत्ती कमालीची वाढली, असा हा विचित्र विरोधाभास : शिवसेना

मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

Sena, Allies Win Maharashtra Local Polls, BJP Takes Most Seats

तसेच राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आल्याने या ठिकाणी नक्की सत्ता कोणाची यावर शिक्कामोर्तब निकाल लागल्यानंतरही झालेलं नाही.

निकालाच्या या सर्व धावपळीत पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देवगड येथे दाखल झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

आज निकाल लागत असणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान झालं. या सर्व ठिकाणच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी