29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयमराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत घेतला. कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.मात्र या निर्णयाला व्यापारी संघटना विरोध करताना दिसत आहेत. यावरुनच शिवसेनेनं आज व्यापारी संघटनांबरोबरच या निर्णयाला विरोध करणाऱ्या राजकारण्यांवरही निशाणा साधलाय(Shiv Sena’s attack on those who oppose Marathi boards).

शिवसेनेची स्थापनाच मराठीच्या मुद्द्यावर झालेली असं सांगतानाच मराठी शाळांची आजची परिस्थिती ही पालकांमुळे निर्माण झाल्याचंही शिवसेनेनं म्हटलंय. यावरूनच मराठी भाषा आणि संस्कृतीचे शत्रू आपल्याच घरात असल्याचे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.

मराठी पाट्यांची सक्ती करण्याची गरज काय, इथपासून ते आम्ही हे होऊ देणार नाही इथपर्यंत प्रकरण पोहोचले आहे,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.

हे सुद्धा वाचा

किरीट सोमय्यांच्या सूड बुद्धीने माझ्यावर कारवाई, प्रताप सरनाईकांचा आरोप

दुकानांच्या पाट्यांवर ‘मराठी’ होणार मोठी, इंग्रजी होणार छोटी; मंत्री सुभाष देसाईंचा दणकेबाज निर्णय

दारूच्या दुकानांना देव देवतांची, महापुरूषांची नावे देण्यास बंदी, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Mandates All Shops And Establishments To Display Signboards In Marathi

सर्वच भाषिक राज्यांत त्या त्या ‘मातृभाषिक’ शाळांसमोर मराठीइतकेच संकट उभे आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे व प्रत्येक स्तरावर मराठी भाषा सक्तीची व्हावी हाच त्यावरचा एक उपाय आहे. महाराष्ट्रात मराठीबाबतचे जसे एक कायदेशीर धोरण ठरले आहे तसे ते इतर राज्यांतही आहेच. दक्षिणेकडील राज्यांत गेलात तर संवाद आणि संपर्काचे वांधेच होतात. मराठी भाषा आणि संस्कृतीचे शत्रू आपल्या घरातच आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

राज्यातील दुकाने, आस्थापनांच्या पाट्या आता मराठीतच असतील, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेताच त्यावर महाराष्ट्रातल्या लोकांनीच टीका-टिप्पणी सुरू केली आहे. मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या नतद्रष्टांनी ‘मराठी’चा युद्ध इतिहास समजून घ्यावा. नंतर मराठी विरोधकांच्या गोवऱ्या मसणात रचल्यावर रडगाणी गाऊ नयेत! अशा शब्दांत संजय राऊत यांनी मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना सुनावले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी