लेकीचे गुण वाढविल्याने मुख्यमंत्रीपद गमवावे लागलेल्या नेत्याची कहाणी

प्राची ओले : टीम लय भारी

दिवंगत मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची शिस्तप्रिय, वक्तशीर आणि चारित्र्यसंपन्न नेते म्हणून ख्याती होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. काँग्रेसशी ते एकनिष्ठ राहून विधानसभेत दहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. पक्षाची पडझड होत असतानाही त्यांनी कॉंग्रेस प्रतीची निष्ठा बदलली नाही (Shivajirao Patil Nilangekar was known as a disciplined leader).

गांधीजींनी हिंदू-मुस्लिम ऐक्य ‘या’ चळवळीत घडवून आणले होते

राज्यपालांकडून पंडीत नेहरूंचा अवमान, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला संताप

लातूर, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यात खंडपीठाच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मागास भागात शिक्षणाची गंगा नेऊन तेथे शैक्षणिक संस्था उभारली. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविणारे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी शोधप्रबंधात मराठवाड्याच्या विकासाचा वेध घेतला. एम. ए. आणि एल. एल. बी. या दोन्ही पदव्युत्तर पदव्या त्यांनी एकदम मिळवल्या (Shivajirao Patil Nilangekar was the first Chief Minister to get a doctorate by writing a dissertation).

एम.डी. परीक्षेत आपल्या मुलीच्या गुणांमध्ये बदल केल्याचे समजल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली, परीक्षेतील मार्क वाढवून घेण्याबद्दल अनावश्यक दबाव आणल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यावर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतर त्यांना या प्रकरणात निर्दोष सोडण्यात आले असले तरी त्यांचे नुकसान झाले. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता, त्यांचा कार्यकाळ सर्वात अल्प मानला जातो (Shivajirao Patil Nilangekar had resigned from the post of Chief Minister due to his daughter’s merits).

शिवाजीराव पाटील ह्यांना मुलीच्या गुणांमध्ये फेरबदल केल्याने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता

लोकमान्य टिळकांनी मुस्लीमांना वेगळे मतदारसंघ दिले, पंडित नेहरूंनी ते काढून घेतले; गांधींनी मुस्लिमांचे फाजिल लाड केले नाहीत

RBI Expert Panel Recommends Merger of Weaker Urban Co-op Banks (moneylife.in)

मुंबई विद्यापीठाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झालेल्या एमडी (प्रसूती आणि स्त्रीरोग) परीक्षांचे निकाल जाहीर केले होते. निलंगेकर यांची मुलगी चंद्रकला यांना उत्तीर्ण करण्यासाठी केलेल्या अनियमिततेशी संबंधित काही पुरावे होते. एमडी पदवी मिळवण्यात आधीच तीन वेळा चंद्रकला ह्या अपयशी ठरल्या होत्या. सीलबंद परीक्षेच्या नोंदी उघडल्या आणि तपासल्या असे आरोप त्यांच्यवर लावण्यात आले होते.

 

वैष्णवी वाडेकर

Share
Published by
वैष्णवी वाडेकर
Tags: 10th chief minister of maharashtrachandrakala shivajirao patil nilangekarcm shivajirao patilcongrescongres cm in maharashtracongress partyex cm of maharashtraHeadline newsLayBhari breakingLaybhari newsless time period cm of maharashtraMaharashtra Breaking newsMaharashtra Chief MinisterMahavikas Aghadi GovernmentMantralayaMarathi HeadlineMarathi NewsmumbaiMumbai BreakingNews updateNews Update in Maharashtrashivajirao patilshivajirao patil and his daughtershivajirao patil deathShivajirao Patil NilangekarTushar Kharat NewsViral newswhy shivaji rao resignedकॉंग्रेसकॉंग्रेस पार्टीकॉंग्रेस मुख्यमंत्री महाराष्ट्रघडामोडीचंद्रकला शिवाजीराव पाटील निलंगेकरतुषार खरातमराठी बातम्यामहाराष्ट्रमहाराष्ट्र ब्रेकिंगमहाराष्ट्राचे 10 वे मुख्यमंत्रीमहाराष्ट्राचे कमी कालावधीचे मुख्यमंत्रीमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्रीमुख्यमंत्री शिवाजीराव पाटीललई भारी बातम्यालय भारी बातम्याशिवाजी राव यांनी राजीनामा का दिलाशिवाजीराव पाटीलशिवाजीराव पाटील आणि त्यांची मुलगीशिवाजीराव पाटील निलंगेकरशिवाजीराव पाटील मृत्यू

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

18 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

18 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

18 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

18 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

18 hours ago