30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयलोकमान्य टिळकांनी मुस्लीमांना वेगळे मतदारसंघ दिले, पंडित नेहरूंनी ते काढून घेतले; गांधींनी...

लोकमान्य टिळकांनी मुस्लीमांना वेगळे मतदारसंघ दिले, पंडित नेहरूंनी ते काढून घेतले; गांधींनी मुस्लिमांचे फाजिल लाड केले नाहीत

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सामनामधून हिंदुस्थानच्या फाळणीवर भाष्य केले आहे. लोकमान्य टिळकांनी मुस्लिमांना वेगळे मतदार संघ दिले होते परंतु, नेहरूंनी भारत स्वतंत्र होताच मुस्लिमांसाठी  असलेला मतदार संघ रद्द केला होता, असे सामनातून राऊतांनी म्हटले आहे (Sanjay Raut has commented on the partition of India from Samna).

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत – पाकिस्तानच्या फाळणीचा 14 ऑगस्ट हा दिवस ‘ वेदना स्मृती दिवस ‘ म्हणून पाळण्याची घोषणा केली होती. मोदींनी ट्विट करत ही माहिती दिली होती. त्यांच्या या ट्विटला राऊतांनी खडे बोल सुनावले आहेत.

Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

Sanjay Raut : ईडीचा नवा खुलासा:प्रवीण राउत-संजय राउत यांच्या पत्नी पार्टनर! वर्षा राउत यांना 55 लाखांचे बिनव्याजी कर्जही दिले, ED चा गंभीर आरोप

Sanjay Raut has commented on the partition of India from Samna
गांधींनी कधीही मुसलामनांचे फाजिल लाड पुरवले नव्हते

लोकमान्य टिळकांनी 1916 साली लखनौ करार केला होता. या करारामुळे नवा सिंध प्रांत निर्माण झाला. देशात ऐक्याची भावना रहावी व स्वातंत्र्य चळवळीत धार्मिक वाद निर्माण होऊ नये, म्हणून टिळकांनी मुसलमानांसाठी वेगळा मतदार संघ मान्य केला होता.

परंतु याचा अर्थ मुसलमानांनी आपण स्वतंत्र वेगळे राष्ट्र आहोत असा घेतला. त्यामुळे हे प्रकरण देशाच्या विभाजना पर्यंत पोहोचले आणि देशाची फाळणी झाली. परंतु देश स्वतंत्र होताच नेहरूंनी मुसलमानांसाठी लखनौ येथे असलेला मतदार संघ रद्द केला होता. त्याचबरोबर मुसलमानांना दिलेल्या सोयी सुविधाही  रद्द करून टाकल्या होत्या असे राऊतांनी सांगितले.

Narendra Modi : शेतक-यांना अधिकार दिला, कृषी कायद्यात चुकीचे काय?

Shiv Sena Does A U-turn On Partition Remembrance Day, Echoes Congress Citing ‘old Wounds’

तसेच गांधींनी कधीही मुसलामनांचे फाजिल लाड पुरवले नव्हते. त्यामुळेच मोहम्मद जिना यांनी गांधीच्या हाती काँग्रेसचे नेतृत्व येताच काँग्रेसमधून बाहेर पडले. त्याचबरोबर जिना यांनी स्वतः लाच मुसलमानांचे नेते मानले होते असे ही राऊत म्हणाले (Gandhi never pampered Muslims).

फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? त्यापेक्षा फाळणी करून तोडलेली भूमी पुन्हा आपल्या देशात कशी सामील होईल ते पाहावे. त्याशिवाय राष्ट्रभक्त जनतेच्या मनात आणि देशात शांतता नांदणार नाही असे ही राऊत म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी