29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयराज्यपालांकडून पंडीत नेहरूंचा अवमान, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला संताप

राज्यपालांकडून पंडीत नेहरूंचा अवमान, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला संताप

 

टीम लय भारी
बावीसाव्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून, राज भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. (Nehru was the person koshyari criticized on ‘kaargil vijay divas’)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्याच बरोबर इतर अनेक सहज न दिसून येणाऱ्या प्रश्नांवर बोट ठेवले आहे.

महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यात राज्यसरकार बांधणार संरक्षक भिंत

मुख्यमंत्र्यांची सातारा, पाटण फेरी हुकली, पुढला प्रवास पुण्याकडे

अशोक चव्हाण असे म्हणाले की देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपालांनी केलेले विधान अर्धसत्य आणि अपूर्ण आहे. तसेच वास्तविकतेचा विपर्यास करणारे आहे.

शांततेचा मार्ग जोखणे म्हणजे कमकुवतपणाचे लक्षण नव्हे. तसे असल्यास लाहोर येथे ‘सदा ए सरहद’ बस घेऊन जाणारे अटल बिहारी वाजपेयी, पाकिस्तानातील जीना यांच्या कबरीला भेट देणारे लालकृष्ण अडवाणी, पाकिस्तान चे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त पाकिस्तानास भेट देणारे नरेंद्र मोदी यांनाही कमकुवत म्हणावे का? असेही अशोक चव्हाण म्हणाले.

Nehru
अशोक चव्हाण

राष्ट्रीय सुरक्षेबाबत पूर्वीची सरकारे जागृत नव्हती असे म्हणणे अत्यंत चुकीचे होईल, त्याचबरोबर भारताच्या माजी पंतप्रधानांचा तो अपमान असेल. स्वातंत्र्य मिळवल्यानंतर भारतातील कित्येक संस्थाने नेहरू यांच्या नेतृत्वाखालीच भारतात विलीन झाली. तेव्हा आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ भारताची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली. अशा प्रतिकूल परिस्थितीतही देशाची उभारणी करणे व परराष्ट्र धोरण ठरवणे यात नेहरूंनी दिलेले योगदान विसारण्याजोगे नाही.

 

शीतयुद्धाच्या वेळी तत्कालीन दोन महासत्ता अमेरिका व रशिया यांचे युद्ध चालू असताना टिटो आणि नासेर यांना सोबत घेऊन उभी केलेली अलिप्तता वादी चळवळ हे एका प्रकारे नेहरूंनी जागतिक महासत्ताना दिलेले आव्हान होते.

लाल बहादूर शास्त्री यांच्या काळात भारताने लाहोर पर्यंत पोहोचणं, इंदिरा गांधी यांच्या काळात पाकिस्तान चे दोन तुकडे होणं, अतिशय महत्वाचे असे सियाचीन ग्लेशियर ताब्यात घेणं, राजीव गांधी यांच्या काळात पंजाब व पूर्वेकडील भागांत शांतता प्रस्थापित करणं, चीन व पाकिस्तान सरहद्दीवर लष्करी मोहिमा राबवणं हेही नसे थोडके.

ज्या कारगिल दिनानिमित्त राज्यपाल बोलत होते ते युद्ध आणि त्यापूर्वीचीपाकिस्तान ची भारतातील घुसखोरी वाजपेयींच्या काळात घडली ह्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

होमी जहांगीर भाभा यांच्या सोबतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच भारताच्या आण्विक सुसज्जतेची सुरुवात केली. महासत्तांच्या आणि संपूर्ण जगाच्या दबावाला भीक न घालता पोखरण येथील पहिला अणुस्फोट इंदिरा गांधी यांच्या काळात झाला होता.

दोन आठवड्यांपासून पालघर जिल्ह्यातील वसई विरार मध्ये लसीकरण बंद!

Nehru’s weakness was he wanted to be messenger of peace, says Maharashtra governor Koshyari

वाजपेयींच्या काळात झालेल्या चाचण्यांची पूर्वतयारी पी व्ही नरसिंह राव यांच्या काळात पूर्ण झाली. स्वतः डॉ. अब्दुल कलाम यांनी त्याविषयी जाहीर वक्तव्य केलंय. याकडे राज्यपालांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

शक्य तेवढे युद्ध टाळून किंवा कमीत कमी लढून मिळवलेला विजय ही सर्वोत्तम जीत असते. हा विजय माणसाच्या मुत्सद्देगिरीचा, विचारशक्तीचा आणि हुशारीचा असतो. जेव्हा मनुष्याच्या सारासार विचार करण्याच्या बुद्धीपेक्षा पक्ष मोठा होतो तेव्हा खऱ्या अर्थाने राष्ट्राची प्रगती खुंटलेली असते.

https://youtu.be/bwoPIDtMc-4

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी