30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeसंपादकीयगांधीजींनी हिंदू-मुस्लिम ऐक्य ‘या’ चळवळीत घडवून आणले होते

गांधीजींनी हिंदू-मुस्लिम ऐक्य ‘या’ चळवळीत घडवून आणले होते

प्राची ओले : टीम लय भारी

ब्रिटीश सरकारच्या  विरुद्ध भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ केली होती. तुर्कस्थान हा जगातील सर्व मुस्ल्लीमांचा धर्मप्रमुख खलिफा असल्याचे मानले जाते. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी 1918–22 च्या कालखंडात तुर्की साम्राज्याचे तुकडे करून सुलतानाची सत्ता संपुष्टात आणण्याचा विचार विजयी ब्रिटन व फ्रान्स या दोस्त राष्ट्रांनी केला होता (Khilafat movement was started by Indian Muslims against the British government).

लोकमान्य टिळकांनी मुस्लीमांना वेगळे मतदारसंघ दिले, पंडित नेहरूंनी ते काढून घेतले; गांधींनी मुस्लिमांचे फाजिल लाड केले नाहीत

‘धनगरांनी भाजपच्या आंदोलनात सहभागी होऊ नये’

Khilafat movement started by Indian Muslims against British
गांधीजीनी खिलाफत आंदोलनाला आपला पाठींबा जाहीर केला होता

तुर्कस्थानच्या सुलतानाचा हा झालेला अपमान भारतातील धर्मनिष्ठ मुसलमानांना सहन झाला नव्हता. परंतु विजेत्या राष्ट्रांनी अखेर तुर्कस्थानची मोडतोड केलीच. यामध्ये ब्रिटनचा मुख्य हात होता त्यामुळे खलिफाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. त्याविरुद्ध भारतात चळवळ झाली. गांधीजीनी खिलाफत आंदोलनाला आपला पाठींबा जाहीर केला होता. महात्मा गांधीजीनी याच संधीचा फायदा घेऊन हिंदू-मुस्लिम ऐक्य निर्माण करण्याचा त्याचबरोबर असहकार चळवळीला मुस्लिमांचा पाठींबा मिळविण्याचा प्रयत्न केला. तुर्की खिलाफत नष्ट होत होती. ब्रिटिश सत्ताधारी त्यास कारणीभूत होते, हे पाहून ब्रिटिशांनी खिलाफत सावरावी, नष्ट होऊ देऊ नये म्हणून भारतातील मुस्लिम समाजाने गांधीजींच्या नेतृत्वाखाली खिलाफत चळवळ सुरू करण्याचा निश्चय केला. हिंदु-मुस्लिम ऐक्याकरिता गांधी धडपडत होते. त्यांनी असहकारितेच्या चळवळीला खिलाफत चळवळीची जोड दिली (Khilafat movement Gandhiji had declared his support).

तब्बल 23 वर्षांनंतर भारतीय व्यक्तीची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका

Was Jinnah secular?

31 ऑगस्ट 1920 मध्ये खिलाफत चळवळीला सुरुवात झाली. महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे 24 नोव्हेंबर 1919 रोजी ‘अखिल भारतीय खिलाफत काॅन्फरन्स’ भरविण्यात आली होती. हिंदुनी या खिलाफत चळवळीत मदत करावी अशी मागणी गांधीजींनी हिंदूंना केली होती. मुस्लिमांनी देखील हे मान्य केले आणि हिंदुनीही त्यांच्या चळवळीला मदत केली. अशा प्रकारे हिंदू-मुस्लिम ऐक्य व मुस्लिमांना असहकाराच्या चळवळीत सामील करून घेण्याचे महत्त्वाचे कार्य गांधीजीनी पार पाडले (The Khilafat movement began on 31 August 1920).

Khilafat movement started by Indian Muslims against British
हिंदु-मुस्लिम ऐक्याकरिता गांधी धडपडत होते. त्यांनी असहकारितेच्या चळवळीला खिलाफत चळवळीची जोड दिली

हिंदू-मुस्लिम ऐक्याला दंगलींनी तडेही जात होते. मलबार, पंजाब, बंगालमध्ये 1921 व 1922 मध्ये जातीय दंगे झाले. मलबारमध्ये मोपलांनी बंड केले. 10 नोव्हेंबर 1922 रोजी लोझॅन येथे दोस्तांची परिषद भरली. दोन महिने चर्चा चालली. मुस्ताफा केमाल अतातुर्कच्या निधर्मी नेतृत्वाखाली अंगोरा सरकारने कॉन्स्टँटिनोपल शहराचा ताबा घेतला. तुर्कस्तानचा सुलतान आपला जीव वाचविण्याकरिता ब्रिटिश जहाजातून माल्टाला गुप्तपणे पळून गेला. 1923 मध्ये त्याला पदच्युत करण्यात आले. त्याच्यानंतर त्याचाच पुतण्या गादीवर बसला. सुलतानाची जागा रद्द झाली व नवी व्यक्ती खलीफा म्हणून आली. तुर्कस्तान हे निधर्मी प्रजासत्ताक राज्य खलीफाची जागा 1924 साली खालसा करण्यात आली. आणि त्यामुळे खिलाफत चळवळ आपोआप विराम पावली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी