राजकीय

शिवेंद्रराजेंनी साधला उदयनराजेंवर निशाणा, म्हणाले

टीम लय भारी

सातारा: झी मराठी वरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात आपण काही स्टंट बघितले. ते स्टंट म्हणजे वार्‍यावरची वरात होती. मोटारसायकल वार्‍यावरून जाते आणि खाली उतरते. खाली उतरायचा विषय नाही. त्यांचं कामच सगळं वार्‍यावरचं आहे. जमिनीला धरून काही नसतंय, त्यांचे जे काही आहे ते ‘वरून’च चालू असतंय. त्यांच्या कामाप्रमाणेच हवेतून मोटारसायकल आली अन् खाली उतरली, अशी खोचक टीका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्यावर केली.(Shivendra Raje aimed at Udayan Raje)

शिवेंद्रराजे भोसले यांनी सातार्‍यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी खा. उदयनराजेंना तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? जसे उदयनराजे तुम्हाला आय लव्ह यू म्हणतात तुम्ही तसे म्हणाला का? या पत्रकारांच्या प्रश्‍नावर आ. शिवेेंद्रराजे म्हणाले, त्यांना वाढदिनी शुभेच्छा दिल्या आहेत. माझा त्यांना डायरेक्ट फोन लागत नाही. सुनील काटकरांना माझा फोन लागला. मी त्यांच्याजवळ शुभेच्छा दिल्या. मी सुनील काटकरांना कसे काय आय लव्ह यू बोलणार? असा उलटप्रश्‍नच शिवेंद्रराजेंनी केला.

आपण वार्‍यावरची उडी पाहिली. मोटारसायकल वार्‍यावरून जाते आणि खाली उतरते. खाली उतरायचा विषय नाही. त्यांचे सगळं कामच वार्‍यावरचं आहे. जमिनीला धरून काही नसतंय, त्यांचे जे काही आहे ते ‘वरून’च चालू असतंय. त्यांच्या कामाप्रमाणे हवेतून मोटारसायकल आली अन खाली उतरली. काही हरकत नाही. आपल्याला तर तसे हवेतले जमणार नाही. आपण स्वतःच्या पैशाने गाडी घेतली आहे, ती रस्त्याने चालत आहे, असा टोलाही आ. शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना लगावला.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट; तर्क-वितर्कांना उधाण!

आरक्षणावरून संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, तर उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

उदयनराजे भोसले यांची राज्य सरकारवर खोचक टिका

BJP MP Raje Bhosale meets Ajit Pawar, triggers speculation

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

17 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

17 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

18 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

20 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

21 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

21 hours ago