राजकीय

सामान्य माणूस ‘मुख्यमंत्री‘ पदी विराजमान झाला

 

टीम लय भारी

मुंबईः आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन केले. यावेळी त्यांच्या सोबतच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा जय घोष केला. शिवसेना स्टाईलने जय घोष करण्यात आला.यावेळी त्यांचे कुटुबीय हजर होते. एमएमआरडीचे अधिकारी देखील हजर होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे एका सामान्य कुटुंबात जन्माला आले होते. ते स्वतः रिक्षा चालवत होते. त्यांचे आईवडील कष्टाचे काम करत होते. त्यामुळे सामान्य माणूस मुख्यमंत्री पदी विराजमान झाला.

राजकारणात काहीही घडू शकते
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘न भूतो न भविष्यती‘ असा इतिहास राजभवनातील दरबार हाॅलमध्ये रचला गेला. मुख्यमंत्री या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला भाजप पक्षश्रेष्ठींनी पहिल्या पायरी वरुन खालच्या पायरीवर उतरवले. ही देशाच्या राजकारणातली सर्वात आश्चर्य कारक घटना आहे, असे असले तरी सत्तेसाठी काय पण? याचा प्रत्यय संपूर्ण भारतीयांना आला.

खूर्चीच्या मोहासाठी एखादा माणूस काहीही करु शकतो. हे बंडखोर आमदारांनी देशाला दाखवून दिले. पक्षासाठी झटणाऱ्या माणसाला कसे मागे खेचले जावू शकते याचे उदाहरण म्हणजे फडणवीसांचा भाजपने केलेला अपमान आहे. संपूर्ण देशातील लोकांना राजकारण म्हणजे काय हे आता समजले आहे.केवळ पक्षश्रेष्ठींचा मान ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नाईलाजाने शपथ घेतली.

फडणवीसांना मोदींचा फोन
ऐन वेळेला देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. त्यांचा मंत्री मंडळातील सहभाग आवश्यक असल्याचे व्टिट आमित शहांनी केले होते. या आगोदर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आता त्यांना पहिल्या पायरी वरुन खाली उतरवण्यात आले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असे आधी ठरले नव्हते. त्यामुळे फडणवीसांवर प्रेम असणारे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्या विनंतीला मान देवून ते उपमुख्यमंत्री झाले. पंतप्रधान मोदींनी देखील फडणवीसांना दोन वेळा फोन केला होता. त्यानंतरच फडणवीसांनी निर्णय घेतला. ते पंतप्रधानांचा आग्रह मोडू शकत नव्हते. फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळण्याची शक्यता आहे.

अखेर ‘बंड‘ ‘थंड‘ झाले
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री मंडळात ते नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हयाचे पालक मंत्री होते. 10 दिवसांच्या कठीण संघर्षानंतर त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले. या खूर्चीवर बसण्यासाठी त्यांना सुरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करावा लागला.आज ईश्वराला साक्ष ठेवून घेतलेली शपथ ते खरचं तंतोतंत पाळतील का ? हे येणारा काळच ठरवले. आशा प्रकारे 10 दिवसांचे बंड इच्छा पूर्तीने थंड झाले.

एकनाथ शिंदेंचा जीवन परिचय
एकनाथ शिंदेचा जन्म सातारा जिल्हयातील महाबळेश्वर तालुक्यातील आहिर गावी झाला. त्याचे शिक्षण बीए पर्यत झाले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव लता असून त्यांना एक मुलगा आहे. त्यांनी राजकारणात स्वतःला झोकून दिले आहे. त्यांचा समाज कार्यात देखील सहभाग आहे. ते उदयोजक आहेत. त्यांनी शिवसेना या बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.ते कोपरी, पाच पाखाडी, जिल्हा ठाणे येथे राहतात.

ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते 1986 मध्ये स्वागतअध्यक्ष होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आंदोलनात ते सहभागी झाले होते. 40 दिवस बेल्लारी येथे त्यांनी तुरुंगवास भोगला. ठाणे जिल्हयाच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. ओपन आर्ट गॅलरी, सचिन तेंडूलकर मिनी स्टेडियम उभारण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. तसेच आदिवासी भागातील आश्रम शाळा, गरीब रुग्णांना मोफत विनामुल्य औषध वाटप करण्यात त्यांचा सहभाग होता. पालघर, बोईसर, सफाळे परिसरात विद्यार्थ्यांसाठी त्यांनी भरीव कार्य केले. पुरग्रस्तांना मदत, वृ़क्षारोपण मोहिमा राबवल्या.

समृध्दी महामार्ग, वांद्रे वरळी सी लिंक, वाशी खाडी पूलाची कामे करण्यातही त्यांची महत्वाची भूमिका आहे. आरोग्य मंत्री असतांना आशा सेविकांचा पगार वाढ केला. ठाणे मेट्रोच्या कामाला गती दिली. ठाणे महानगर पालिकेत ते चार वर्षे सभागृह नेता होते. 2014 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेता होते. 2019 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री, 2019 पासून ते शिवसेनेचे गटनेते होते. तर फेरनिवडणुकीनंतर नोव्हेंबर 2019 ते जुन 2022 पर्यंत ते नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.

हे सुध्दा वाचा: 

एकनाथ शिंदेंनी 11 वी नंतर ‘डायरेक्ट’ 15 वीची दिली परीक्षा

हो !राजकारणात काहीही घडू शकतं

‘तीन‘ वर्षात ‘चार‘ वेळा सरकार कोसळले

 

नवेली कांबळे

Naveli Kamble is a reporter/ sub editor.

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

7 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

7 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

8 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

8 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

10 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

10 hours ago