राजकीय

पंतप्रधानांनी आता जाहीर करावे, लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे : उद्धव ठाकरे

काय बोलायचे हा देशातला मोठा प्रश्न. निवडणुक आयोगाचा निकाल लोकशाहीसाठी घातक आहे.. देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वर्षात आता सरकारची दादागिरी सुरु आहे. पंतप्रधानांनी आता जाहीर करावे लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे. आजचा निकाल अत्यंत अनपेक्षित. जगातल्या मोठ्या पक्षाची स्वतः हून लढण्याची हिंमत नाही. निवडणुका घेण्याचे आव्हान मी केले. आता चिन्ह मिंधे गटाला दिल्यावर आता मनपा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता. मुंबईवर ताबा मिळवण्याची भाजपची रणनिती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आय़ोगाने शुक्रवारी निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. (Uddhav Thackeray‘s Press Conference after Election Commission’s Shiv Sena party, party symbol results)

शिवसेनाप्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडेच आहे. १०० कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकले. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकू अशी आशा आङे.. केंद्रीय मंत्री म्हणाले होते द्या ब्रेकींग न्यूज. आज धनुष्यबाण ओरबाडून घेतले तरी तुम्हाला मिळणार नाही. चोरी पचली तरी चोर चोरच असतो. शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका, असे चोर चोरी पचवू शकणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्ही न्यायालयाला विनंती केली होती की निवडणुक आयोग गडबड करणार. आमचा सर्वोच्च न्यायालयावर आमचा नितांत विश्वास आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या केसवर जगाचे लक्ष आहे. हे सगळे लोकशाही विरोधी कृत्य परकीय गुतंवणूकदार पण बघताहेत. गेले काही दिवस निवडणुक आयोगाचे थोतांड सुरु आहे. आम्ही शपथपत्र, अर्ज लाखोंच्या संख्येने सादर केली. पण निवडणुक आयोगाने आज शेण खाल्ले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बाळासाहेबांचे विचार गुलामी करण्याचे नाहीत. आम्ही अंधेरीची पोटनिवडणुक जिंकलो. महाराष्ट्रात मोदी नाव चालत नाही, त्यामुळे आता बाळासाहेब चोरले. महाराष्ट्रात आज दोन पोटनिवडणुका सुरु आहेत तेव्हाच निवडणुक आयोगाने निकाल दिला. देशाचे न्यायालय ही शेवटची आशा आहे. शिवसेना आता जोमाने पुढे येणारच. अंधेरी पोटनिवडणुक झाली तेव्हा पण धनुष्यबाण नव्हते पण अगोदरपेक्षा आम्हाला अधिक मते मिळाली. उद्या कदाचित आम्हाला दिलेली मशाल पण काढून घेतील. ह्याची नोंद ठेवा असे शिवसैनिकांना आवाहन करत ठाकरे म्हणाले, यांनी कागदावर धनुष्यबाण चोरलाय. आता भाजप बाळासाहेबांचा चेहरा लावून निवडणुका जिंकायच्या आहेत.

हे सुद्धा वाचा

शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचा; निवडणूक आयोगाने ‘हे’ मुद्दे घेतले विचारात

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला

…तर सरकार वाचले असते; ‘वंचित’ची संजय राऊतांवर टीका

पाच न्यायमूर्ती निकाल देणार असतील तर आमचा आक्षेप नाहीच. ते निष्पक्षपणे सुनावणी घेताहेत. जे शिवसैनिक भेटतात त्यांना मी हेच सांगितले आपण १९६६ सालात आहोत. आपण देण्याचे काम केले. निवडणुकांसाठीच निवडणुक आयोगाने ठरवून निकाल दिला. निवडणुक प्रक्रिया कशी पार पडली त्याच्या सीडी इत्यादी सगळच निवडणुक आयोगाला दिले. सदस्य संख्या, पदाधिकारी आमच्या बाजूने आम्ही त्यांना भारी पडले. आम्ही निवडणुक आयोगाला घरची रद्दी नाही दिली. ज्या पद्धतीने हलकटपणा सुरु आहे तसे कदाचित ते मशाल पण काढून घेऊ शकतात असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले.

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

2 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

3 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

3 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

3 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

3 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

7 hours ago