31 C
Mumbai
Monday, May 22, 2023
घरराजकीय...तर सरकार वाचले असते; 'वंचित'ची संजय राऊतांवर टीका

…तर सरकार वाचले असते; ‘वंचित’ची संजय राऊतांवर टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडी सरकार असताना मला अटक करण्याचा डाव होता, असा गौप्यस्फोट केला. त्यानंतर राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. संजय राऊत यांनी देखील फडणवीसांवर टीका केली होती. त्यानंतर त्यानंतर वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) लक्ष्य केले आहे. फडणवीस यांनी दाखल केलेल्या भीमा-कोरेगाव्या खोट्या गुन्ह्या संदर्भात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना तपास करायला सांगितले असते तर, मविआ सरकार वाचले असते असे मोकळे (Siddharth Mokale) यांनी म्हटले आहे. (Siddharth Mokale spokesperson Of Vanchit Bahujan Aghadi criticism of Sanjay Raut)

सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेच्या संदर्भात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, आणि शिवसेना नेते प्रवक्ते संजय राऊत हे रोखठोकपणे त्यांना उत्तर देत आहेत. मात्र याच रोखठोकपणे संजय राऊत यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या भीमा कोरेगावच्या खोट्या गुन्हा संदर्भात तपास करायला सांगितलं असतं, तर आम्हाला असं वाटतं की त्यांचं सरकार वाचलं असतं.

हे सुद्धा वाचा

उत्तराखण्डमधील दुर्गम भागातील क्षयग्रस्त रुग्णाला ड्रोनमार्फत औषधांची एअर डिलिव्हरी

अक्षय गवसाने दिग्दर्शित ‘फेमस’ या ऍक्शनपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस

अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची ऑफर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा विधान केलेलं आहे की भीमा कोरेगाव प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे हे खोट्या स्वरूपाचे आहेत. केंद्रीय नेत्यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये हे खोटे गुन्हा दाखल केल्याचं आपण सर्वांनीच बघितलेलं आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना जर संजय राऊतांनी याच रोखठोक पद्धतीने जर गृहमंत्री अनिल देशमुख यांना या प्रकाराचा तपास करायला आणि छडा लावला सांगितलं असतं तर कदाचित महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची हिंमत भारतीय जनता पक्षाची झाली नसती, असे देखील सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी