31.9 C
Mumbai
Sunday, May 14, 2023
घरराजकीयशिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला

केंद्रीय निवडणूक आयोगाने (EIC) ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह “धनुष्यबाण’ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Shiv Sena party name and bow and arrow party symbol to Eknath Shinde Group)

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर देखील दावा केला होता. त्यानंतर याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु होती. आज निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे.

निवडणूक आयोगाने सत्य आणि न्यायचे धिंडवडे काढले : संजय राऊत

निवडणूक आयोगाने सत्य आणि न्यायचे धिंडवडे काढले. चाळीस बाजार बुणगे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगतात आणि निवडणूक आयोग त्यास मान्यता देते.ही पटकथा आधीच लिहून तयार होती. देश हुकूशाहीकडे निघाला आहे. निकाल आमच्या बाजूनेच लागेल असे गद्दार सांगत होतेच.खोके चमत्कार झाला! लढत राहू.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी