जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त दादरमध्ये होणार व्यंगचित्र जत्रा

टीम लय भारी

मुंबई :  पाच मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन (World Cartoon Day)  म्हणून साजरा केला जातो. मुंबईतील  दादरमध्ये जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त ४ मे ते 5 मे या दोन दिवशी व्यंगचित्र जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक तसेच कार्टूनिस्ट कम्बाईन यांच्या सहकार्याने व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या व्यंगचित्र स्पर्धेला देश-विदेशातील स्पर्धकांकडून प्रतिसाद मिळत आहे. (World Cartoon Day will be held in Dadar cartoon fair) 

काय आहे स्पर्धेचा विषय ?


‘रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग’ या विषयावर आधारित ही स्पर्धा होणार आहे. दैनंदिन आयुष्य जगताना आपण अनेक युध्दाच्या प्रसंगाचा सामना करतो. याशिवाय वाहतूक कोंडी, पशु, पक्षी, जलचरांच्या समस्या, वाढते शहरीकरण, आरोग्याच्या विविध समस्या, ढासळती कुटुंबव्यवस्था आदी समस्या आपल्याला भेडसावत असतात. याच विषयांवर भाष्य करणारी व्यंगचित्रे रेखाटण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळणार आहे.

४०० हून अधिक स्पर्धक विदेशातील आहेत


स्पर्धकांनी A4 आकाराची ३०० dpi असलेली इमेज cc.combine@gmil.com या इ मेलवर ३० एप्रिलपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडक व्यंगचित्रांचे भव्य प्रदर्शन ‘व्यंगचित्र जत्रा’ या एका विशेष कार्यक्रमात ४ आणि ५ मे २०२२ रोजी संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन, शिवाजीपार्क, दादर येथे भरवले जाणार आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत ६०० हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ४०० हून अधिक स्पर्धक विदेशातील आहेत.


हे सुद्धा वाचा :

‘सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व’ राज ठाकरेंच्या व्यंगचित्राची पुण्यात बॅनरबाजी

एका शिवसैनिकाचे बोचरे व्यंगचित्र, भाजप – नारायण राणेंवर निशाणा !

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांचं केलं कौतुक

National Cartoonist Day, May 5: Caricatures, comic strips mesmerise young and old alike

Shweta Chande

Share
Published by
Shweta Chande

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

10 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

11 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

11 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

11 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

13 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

13 hours ago