टॉप न्यूज

अमृता फडणवीसांच्या आवजाची जादू पुन्हा एकदा ऐकायला मिळणार, आगामी मराठी चित्रपटासाठी गायलं गाणं!

टीम लय भारी

मुंबई : मन, माती आणि देश यांचं खूप जवळचं नातं असतं. याचा प्रत्यय आजवर अनेकांनी घेतलाही असेल. प्रत्येकाच्या मनात आपल्या देशाबाबत आणि आपण जिथं जन्मलो त्या मातीबाबत आदराची आणि कृतज्ञतेची भावना असते(Amrita Fadnavis: The magic of voice will be heard once again)

काही मोक्याच्या क्षणी ती शब्दांद्वारे मनातून बाहेरही पडते. विशेषत: परदेशी भूमीवर गेल्यावर आपला देश आणि इथल्या मातीविषयीची ओढ मनात आठवणींचं काहूर माजवते.

काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट, विलासरावांचा व्हिडीओ ट्विट करत अशोक चव्हाणांचा ममतादीदींवर वार

नवाब मलिकांची तेवढी पात्रताच नाही; बाळासाहेब थोरात संतापले

हिच भावना सिनेरसिकांना ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या आगामी मराठी चित्रपटातील एका गाण्यात अनुभवायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुहूर्त झालेल्या ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटातील महत्त्वाचं गाणं नुकतंच रेकॅार्ड करण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांपासून पराग भावसार टच या बॅनरखाली निर्माते पराग भावसार ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या आगामी मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात बिझी आहेत.

युपीएच्या अस्तित्वावर सवाल उठवणाऱ्या ममता बॅनर्जींवर कॉंग्रेसचा पलटवार

Former-Maharashtra CM Devendra Fadnavis’ Wife Amruta Fadnavis Croons The Hindi Version Of Popular Sinhalese Song, Manike Mage Hithe

नुकतंच अंधेरी येथील पंचम स्टुडिओमध्ये या चित्रपटातील ‘ज्या मातीवर जन्म आपला, तोच आपला देश…’ हे गाणं ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. सुमधूर आवाजाची देणगी लाभलेल्या अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी हे गीत गायलं आहे.

मनाला भिडणारे शब्द!

हे गाणं गीतकार श्रीकृष्ण राऊत यांच्या लेखणीतून आकाराला आलं असून, संगीतकार दिनेश अर्जुना यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याबद्दल अमृता म्हणाल्या की, गीतकारांनी लिहिलेली शब्दरचना मनाला भिडणारी आहे. ‘ज्या मातीवर जन्म आपला, तोच आपला देश…’ हे शब्दच मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसे आहेत.

त्यापुढील ‘नकोस विसरू परदेशी तू कधी आपला देश…’ हे शब्द भारतापासून दूर वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना आपल्या मातीची आठवण करून देणारे आहेत.

मनातील भावना अचूक शब्दांच्या सहाय्यानं या गीतात मांडण्यात आल्या असून, संगीतकार दिनेशजी यांनी त्याला सुरेल संगीताचा साज चढवल्यानं हे प्रेरणादायी गीत मनामनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्ज्वलीत करणारं ठरेल यात शंका नाही.

‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटाच्या टायटलसाठी हे गाणं अगदी अनुरूप असल्याची भावनाही अमृता यांनी व्यक्त केली. या गाण्यापूर्वी ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटातील टायटल साँग रेकॅार्ड करण्यात आलं आहे.

कथानकाला कलाटणी देणारं गाणं!

पराग भावसार हे या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन करणार आहेत. ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या शीर्षकारून चित्रपटातील कथानकाचा अंदाज लावणं तसं कठीण असलं, तरी यात एक गोड प्रेमकथा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

‘ज्या मातीवर…’ या गाण्याबाबत भावसार म्हणाले की, हे या चित्रपटातील अतिशय महत्त्वाचं गाणं असून, कथानकाला कलाटणी देणारं आहे. अंगावर रोमांच आणणाऱ्या या गीतासाठी आम्हाला एक सुमधूर आणि त्यातील शब्दांना योग्य न्याय देणारा आवाज हवा होता.

यासाठी एकच नाव डोळ्यांसमोर आलं, ते म्हणजे अमृता फडणवीस… त्यांनीही या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली असून, शब्दांमधील भाव गाण्याच्या माध्यमातून रसिकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे

टीम लय भारी

Recent Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

22 mins ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

16 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

16 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

17 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

17 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

17 hours ago