33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयनवाब मलिकांची तेवढी पात्रताच नाही; बाळासाहेब थोरात संतापले

नवाब मलिकांची तेवढी पात्रताच नाही; बाळासाहेब थोरात संतापले

टीम लय भारी

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे(Nawab Malik does not deserve that much; Balasaheb Thorat)

देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची आवश्यकता आहे पण कोणी लढण्यास तयार नसल्यास किंवा सारखं परदेशात जात असल्यास आम्ही तरी काय करणार, असा सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले.

काँग्रेस आमदार चंदक्रांत जाधव यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची श्रद्धांजली.

Nawab Malik : PM मोदीनी स्वतः लस घेऊन लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी

युपीएचं अस्तित्व आहेच कुठे अशी विचारणाही त्यांनी केली. दरम्यान ममता बॅनर्जींच्या या टीकेवर राज्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस हा फक्त पक्ष नाही तर विचार आहे. अशा वक्तव्यांनी आम्ही अस्वस्थ होणार नाही असं एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

 “ममता बॅनर्जी आज युपीएच्या सदस्यही नाहीत. आतापर्यंत भाजपाला जो विरोध केला आहे तो काँग्रेसने, युपीएने, राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. शेवटी नेतृत्व काँग्रेसलाच करावं लागणार आहे,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती

Mumbai bank sues Nawab Malik for r₹r1,000 crore

दरम्यान यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वास्तव स्विकारण्यासंबंधी दिलेल्या सल्ल्याबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “नबाव मलिकांनी काँग्रेसला सल्ला द्यावं हे काही योग्य नाही. काँग्रेसला सल्ला द्यावा अशी त्यांची पात्रताच नाही”.

 “देशात काँग्रेस पक्ष असून तो भाजपाला विरोध करणारा आहे. पर्याय म्हणून काँग्रेस असून सर्वांचं सहकार्य घ्यावं लागेल हे खरं आहे. युपीए सर्वांचं सहकार्य घेतच असतं,” असंही यावेळी ते म्हणाले.

ममता बॅनर्जींनी काय म्हटलं 

काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अस्तित्व आहेच कुठे, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि काँग्रेस अशी लढत होते त्याच राज्यांमध्ये भाजपा वाढत असल्याचे सांगत काँग्रेसला बुधवारी डिवचले.

दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आलेल्या ममतांनी यांनी काँग्रेसवर टीका केली. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची आवश्यकता आहे पण कोणी लढण्यास तयार नसल्यास किंवा सारखं परदेशात जात असल्यास आम्ही तरी काय करणार, असा सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना तसंच नागरी समाजाच्या सदस्यांशी संवाद साधताना बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या कमकुवतपणावर बोट ठेवलं.

भाजपला समर्थ पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शरद पवार यांनी यूपीएचे नेतृत्व करावे काय, या प्रश्नावर यूपीएच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करीत ममतांनी यूपीएच्या मोकळय़ा खुर्चीवर त्यांनी बसावे काय, असा सवाल केला.

समविचारी शक्ती एकत्र आल्यास भाजपचा पराभव करणे सहज शक्य असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. त्यासाठी जेथे ज्या पक्षांची ताकद आहे त्यांना अधिक महत्त्व द्यावे लागेल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठीच भेट दिल्याचेही बॅनर्जी यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी