33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीययुपीएच्या अस्तित्वावर सवाल उठवणाऱ्या ममता बॅनर्जींवर कॉंग्रेसचा पलटवार

युपीएच्या अस्तित्वावर सवाल उठवणाऱ्या ममता बॅनर्जींवर कॉंग्रेसचा पलटवार

टीम लय भारी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना कॉंग्रेसला लक्ष्य करत मोठं वक्तव्य केलं आहे. कॉंग्रेस प्रणित यूपीएचे अस्तित्व आहेच कुठे? असा सवाल त्यांनी उठवला आहे. यावेळी ममतांनी भाजपा आणि कॉंग्रेस मध्ये स्पर्धा असणाऱ्या राज्यांत भाजपाचा प्रभाव वाढत असल्याचे म्हणले आहे. भाजपाच्या विस्ताराला कॉंग्रेसला कारणीभूत ठरवत, भाजपाला सक्षम पर्याय उभा करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी अधोरेखित केली आहे. आता, ममता बॅनर्जींच्या या वक्त्वयावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन यांनी पलटवार केला आहे(Congress responded Mamata Banerjee for questioning UPA’s existence).    

अधीर रंजन चौधरी एएनआयशी बोलताना म्हणाले की, “ममता बॅनर्जींना यूपीए म्हणजे काय हे माहित नाही का? मला वाटते की त्यांनी वेडेपणा सुरू केला आहे. त्यांना वाटतंय की पूर्ण भारत ‘ममता, ममता’ म्हणू लागला आहे. परंतु भारत म्हणजे बंगाल नाही आणि बंगाल म्हणजे भारत नाही. पश्चिम बंगालमधील मागच्या निवडणुकांमध्ये त्यांनी वापरलेली युक्ती आता हळूहळू उघड होत आहेत,”

‘पंतप्रधानांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला’, काँग्रेस नेत्याचे खोचक वक्तव्य

पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करुन जनतेला दिलासा द्या!: नसीम खान

“२०१२ मध्ये यूपीए सरकारमध्ये सहा टीएमसी मंत्री होते. ममता बॅनर्जींनी यूपीएला दिलेला पाठिंबा काढून घेण्यासाठी काही कारणे त्यावेळी सांगितली होती. त्यांना त्यावेळी यूपीए सरकार पाडायचे होते. पण त्या यशस्वी झाल्या नाही, कारण इतर पक्षांनी लगेच सरकारला पाठिंबा दिला. ममता बॅनर्जींचे हे जुने षड्यंत्र आहे. आज मोदी त्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. ममता काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे,” असा दावा चौधरी यांनी केला.

देशभरातील पोटनिवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदींना दिला ‘हा’ सल्ला!

Congress leader Adhir Ranjan Chowdhury writes to Mamata Banerjee, demands revision of Bengal Covid-19 toll

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी