टॉप न्यूज

भारतात पुन्हा कोरोनाची लाट येणार; पुढचे 40 दिवस धोक्याचे, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

भारतात पुन्हा कोरोनाची लाट येणार आहे. (Covid Wave In India Again) त्यामुळे पुढचे 40 दिवस धोक्याचे आहेत. तज्ज्ञांनीच ही भीती व्यक्त केली आहे. जानेवारीमध्ये ही नवी कोविड लाट येऊ शकते, असा तज्ञांचा अंदाज आहे. कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातल्यानंतर आता तज्ञांचा हा अंदाज सर्वसामान्य भारतीयांची चिंता वाढविणारा आहे.

देशासाठी नवे वर्ष आणि त्यातही सुरुवातीचा जानेवारी महिना परीक्षा घेणारा ठरेल. येत्या 40 दिवसांत भारतातही कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये मोठी वाढ दिसू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसातील आकडेवारी पाहता, भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचा दावा केला जात आहे. पूर्व आशियात कोविडची नवीन लाट आल्यानंतर पुढील 30 ते 35 दिवसांनी भारतात लाट पोहोचते, असे यापूर्वीही दिसून आले आहे. या ट्रेंडआधारे, भारतात पुढचे 40 दिवस धोक्याचे हा दावा केला जात आहे.

चीनमध्ये ओमिक्रॉन बीएफ 7 या सब व्हेरीएन्टमुळे सध्या कहर माजला आहे. हा व्हेरीएन्ट वेगाने संक्रमण पसरवतो. एकाच वेळी 16 लोक त्यामुळे संक्रमित होऊ शकतात. तथापि, आरोग्य मंत्रालयातील सूत्रांच्या मते, यावेळी कोरोना संसर्ग भारतीयांसाठी फारसा गंभीर नसेल. अशा परिस्थितीत, लाट आली तरी रूग्णालयात दाखल होण्याचे आणि रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी असेल. दुसरीकडे, कोरोनाच्या बीएफ 7 या नवीन प्रकारावर औषध आणि लसीच्या प्रभावाबाबतही आरोग्य मंत्रालय अभ्यास करत आहे.

गेल्या तीन दिवसांत भारतात आलेल्या 6 हजार आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 39 आंतरराष्ट्रीय प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हे स्वत: गुरुवारी दिल्ली विमानतळावर पोहोचून माहिती घेणार आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी भारतात कोरोनाचे 188 नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 468 झाली आहे. सध्या भारतात दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेट 0.14 टक्के, तर साप्ताहिक पॉझिटीव्हीटी रेट 0.18 टक्के इतका आहे. हे दर चिंता करण्यासारखे आजिबात नाहीत.

हे सुद्धा वाचा : 

ओमिक्रॉन बीएफ 7 : चीनमध्ये कहर माजवणाऱ्या कोरोना व्हेरीएंटचे भारतात चार रुग्ण; जुलैतच गुजरातमध्ये आढळले होते पहिले प्रकरण; सरकारला जाग आली निवडणुका आटोपल्यांनतरच!! 

धक्कादायक : कोविडमुळे म्हातारा होतोय मानवी मेंदू; याशिवाय होताहेत हे गंभीर परिणाम

कोविड-19च्या तिसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी

सध्या चीनमध्ये कोरोना साथीच्या नवीन प्रकाराने अतिशय गंभीर स्वरूप धारण केल्याच्या बातम्या येत आहेत. एका अहवालानुसार, चीनमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन प्रकरणे समोर येत आहेत. रोजचा रुग्णांचा आकडा लाखात आणि मृत्यूचा आकडा हजारावर जात आहे. सर्व रुग्णालये भरली आहेत, रुग्णांना जागाही मिळत नाही. त्याताच चीनमध्ये औषधांचाही मोठा तुटवडा आहे. अर्थात, चीन सरकारकडून या बातम्या व दाव्यांचे खंडन केले जात आहे. हे सारे असत्य, अतिरंजित आणि दिशाभूल करणारे असल्याचा चीन सरकारचा दावा आहे.

कॅलिफोर्नियास्थित स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते, ओमिक्रॉन बीएफ 7 या सब व्हेरीएन्टचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही. हा ओमिक्रॉन बीए 5 सब व्हेरिएंट ग्रुपचाच एक भाग आहे. फेब्रुवारी 2021 पासून हा व्हायरस 90 देशांमध्ये दिसून आला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, भारतातील बहुसंख्य लोकसंख्येची प्रतिकारशक्ती दुप्पट आहे. दुप्पट म्हणजे, मूलत: प्रकृती स्वास्थ्य आणि मसालेदार, उकडून, टाळून केलेल्या चांगल्या खानपानामुळे असलेली नैसर्गिक प्रतिकारशक्ती आणि जोडीला लसीकरणानंतर आलेली प्रतिकारशक्ती ही आहे.

Covid Wave In India Again, Next 40 Days Are Dangerous, Corona Alert, भारतात पुन्हा कोरोनाची लाट येणार
विक्रांत पाटील

Recent Posts

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

28 mins ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

14 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

16 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

17 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

18 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

18 hours ago