टॉप न्यूज

ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी झोमॅटोविरोधात पोलिसांकडे केली तक्रार दाखल

टीम लय भारी
मुंबई: – भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनी आंबेडकरी संग्रामचे सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे झोमॅटोविरोधात तक्रार दाखल केली आहे. भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे विडंबन आणि विकृतीकरण करून राष्ट्रीय सन्मानाचा घोर अवमान केल्याप्रकरणी शेजवळ यांनी झोमॅटो या खाद्य पदार्थांचे वितरण करणाऱ्या कंपनीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.(Senior journalist Divakar Shejwal complaint with the police against Zomato)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर यांना सादर केलेल्या निवेदनात झोमॅटो कंपनीविरोधात प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट १९७१च्या कलम २ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे निधन

एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

UP Journalist Beaten To Death For Overtaking Car On Bike: Police

हे निवेदन सादर केलेल्या शिष्टमंडळात आंबेडकरी संग्रामचे पदाधिकारी चंद्रसेन कांबळे, गौतम सोनावणे, सीताराम लव्हांडे, राजरत्न डोंगरगावकर यांचा समावेश होता.

या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे दिवाकर शेजवळ यांनी प्रजासत्ताक दिनीच ई मेलद्वारे तातडीची तक्रार केली होती. त्यापाठोपाठ आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार सादर करण्यात आली.  दरम्यान, या प्रकरणात झोमॅटो या कंपनीविरोधात सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Pratikesh Patil

Recent Posts

मतदान फुल करा, नाशिकला कुल करा! पर्यावरणप्रेमींचा जाहीरनामा लोकसभेतील उमेदवारांना सादर

कधी काळी थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये दिवसेंदिवस तापमान वाढीचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित केले जात…

6 mins ago

सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांबाबत गंभीर असून, शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न निकाली काढले जातील.…

16 mins ago

निर्लज्ज नेत्यांनो, जनाची व मनाची असेल तर शेतकऱ्यांचा हा आक्रोश पाहा

लोकसभा निवडणुक आता चौथ्या टप्प्यात पोहचली असून लय भारीची टीम ही पोहचली आहे लासलगाव मध्ये.…

2 hours ago

लोकसभेचे निकाल ‘न भूतो, न भविष्यती असे लागतील : माजी आमदार अनिल कदम

आज लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला.या पार्श्वभूमीवर लय भारी पोहचली आहे दिंडोरी येथे. लय…

3 hours ago

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…

20 hours ago

ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…

21 hours ago