35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी झोमॅटोविरोधात पोलिसांकडे केली तक्रार दाखल

ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी झोमॅटोविरोधात पोलिसांकडे केली तक्रार दाखल

टीम लय भारी
मुंबई: – भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनी आंबेडकरी संग्रामचे सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे झोमॅटोविरोधात तक्रार दाखल केली आहे. भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे विडंबन आणि विकृतीकरण करून राष्ट्रीय सन्मानाचा घोर अवमान केल्याप्रकरणी शेजवळ यांनी झोमॅटो या खाद्य पदार्थांचे वितरण करणाऱ्या कंपनीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.(Senior journalist Divakar Shejwal complaint with the police against Zomato)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर यांना सादर केलेल्या निवेदनात झोमॅटो कंपनीविरोधात प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट १९७१च्या कलम २ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे निधन

एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

UP Journalist Beaten To Death For Overtaking Car On Bike: Police

हे निवेदन सादर केलेल्या शिष्टमंडळात आंबेडकरी संग्रामचे पदाधिकारी चंद्रसेन कांबळे, गौतम सोनावणे, सीताराम लव्हांडे, राजरत्न डोंगरगावकर यांचा समावेश होता.

या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे दिवाकर शेजवळ यांनी प्रजासत्ताक दिनीच ई मेलद्वारे तातडीची तक्रार केली होती. त्यापाठोपाठ आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार सादर करण्यात आली.  दरम्यान, या प्रकरणात झोमॅटो या कंपनीविरोधात सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी