32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeटॉप न्यूजज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे निधन

टीम लय भारी

पुणे : लेखक अनिल अवचट यांचे आज सकाळी 9.15 वाजेदरम्यान त्याचे पुण्यात निधन झाले. जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्त्ये अशी त्यांची ओळख होती. ते 78 वर्षांचे होते. पुणे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल अवटच यांच्या जाण्याने लेखण आणि सामाजकार्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सामाजपरीवर्तनात मोठं योगदान देणारे व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांच्या जाण्यानंतर व्यक्त केली जात आहे(Dr. Anil Awachat, Senior Literary passes away).

पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे अनिल अवचट यांचा जन्म झाला. बी. जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएसची पदवी घेतली. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी अनेक आंदोलने, चळवळींध्ये भाग घेतला. त्यांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. त्यामुळे त्यांनी अनेक विषयांमध्ये काम केले. (हेही वाचा, डॉ. न.म.जोशी आणि अनिल अवचट यांना महाराष्ट्र साहित्य परिषद 2020 चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर)

अनिल अवचट यांनी 1969 मध्ये त्यांनी पूर्णिया हे पहिले पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. आतापर्यंत त्यांनी 22 पूस्तके प्रकाशीत केली आहे. डॉ. अनिल अवचट यांनी पुणे येथे मुक्तांगण नावाचे व्यसनमुक्ती केंद्र सरु केले. अनिल अवचट आणि त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठे केंद्र सुरु केले. त्यांनी व्यसनमुक्तीसाठी वापरलेली पद्धत ही जगभर अनेक व्यसनमुक्ती केंद्रांतून वापरली जाऊ लागली आहे.

हे सुद्धा वाचा

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड

Milena Salvini, ambassador of Kathakali in France, passes away at 84

पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली, त्यांच्या लेखणीतून, पुस्तकाद्वारे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले. शिल्पकला, चित्रकला, फोटोग्राफी आणि मुख्य म्हणजे ओरिगामीतून विविध आकार साकारणे हा त्यांचा आवडता छंद होता. केवळ स्वत:चा विचार न करता दुसऱ्यांसाठी सतत काही ना काही करत राहणारा परोपकारी असा त्यांचा स्वभाव आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी