27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeशिक्षणमुंबई विद्यापीठातील १७८ महाविद्यालयांना प्राचार्यच नाहीत

मुंबई विद्यापीठातील १७८ महाविद्यालयांना प्राचार्यच नाहीत

टीम लय भारी

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत 178 महाविद्यालय प्राचार्य विना असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांची माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. गलगली यांना दिलेल्या महाविद्यालयाच्या यादीत प्रभारीच्या हवाली महाविद्यालये असल्याची माहिती उघडकीस आली आहे(Mumbai University affiliated 178 colleges have no principal).

या यादीत एकूण 808 महाविद्यालयांची नोंद आहे, यापैकी 81 महाविद्यालयात प्राचार्याऐवजी संचालक हे पद अस्तित्वात आहे. तर, 727 पैकी 178 महाविद्यालय प्राचार्य विना आहेत आणि 23 महाविद्यालयाची माहिती विद्यापीठाच्या अभिलेखावर उपलब्ध नसल्याचे समजते(808 colleges are under Mumbai University).

केजे सोमय्या, ठाकूर एज्युकेशनल ट्रस्ट, शहीद कलानी मेमोरियल ट्रस्ट, तलरेजा महाविद्यालय, वर्तक महाविद्यालय, बॉम्बे फ्लॅइंग क्लब महाविद्यालय, रामजी असार महाविद्यालय, गुरुनानक विद्यक भांडुप, शेठ एनकेटीटी महाविद्यालय, जितेंद्र चौहान महाविद्यालय, मंजरा महाविद्यालय, रिझवी महाविद्यालय, अकबर पिरभोय महाविद्यालय, संघवी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, विलेपार्ले केलवानी महाविद्यालय, बॉम्बे बंट्स महाविद्यालय, आरआर एज्युकेशन महाविद्यालय, एचआर महाविद्यालय, अंजुमन इस्लाम महाविद्यालय या महाविद्यालयांत प्राचार्य सारखे महत्वाचे पद रिक्त आहे किंवा प्रभारीच्या हवाली कारभार आहे, असे उघडकीत आले आहे.

हे सुद्धा वाचा 

महाविद्यालय व विद्यापीठ अध्यापकांना आता संवर्गनिहाय आरक्षण मिळणार

मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील इमारतींबाबत धक्कादायक खुलासा

FPJ-Ed: Schools still closed due to COVID-19 surge, education experts, parents and students await a change in decision

अनिल गलगली यांच्या मते उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांची नैतिक जबाबदारी आहे की अश्या महाविद्यालयावर कारवाई करावी. नवीन अभ्यासक्रमास मंजुरी देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कुलगुरु यांनी कोठल्या आधारावर प्रस्ताव मंजूर केला आणि जेव्हा प्राचार्य नाहीत तर अश्या महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रमाची परवानगी कशी देण्यात आली? यात दलालांचा सुळसुळाट तर नाही ना? असा प्रश्न करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी गलगली यांची आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी