टॉप न्यूज

निलम गोऱ्हे यांच्यावर ‘महाविकास आघाडी’चे नेते नाराज

टीम लय भारी

मुंबई : ‘गोंदवलेकर महाराज ट्रस्ट’च्या मंदिर परिसरात 700 बेडचे ‘कोरोना’ सेंटर होऊ घातले होते. पण निलम गोऱ्हे यांनी हे सेंटर हाणून पाडले. त्यामुळे साताऱ्यातील ‘महाविकास आघाडी’चे नेते व कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे ( Mahavikas Aghadi leaders reluctant on Neelam Gorhe ).

सातारा जिल्ह्यातील विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासारखे मातब्बर नेते ‘महाविकास आघाडी’मध्ये आहेत ( Powerful leaders of Mahavikas Aghadi in Satara ). बाळासाहेब पाटील व शंभूराज देसाई असे दोन मंत्री सरकारमध्ये आहेत.

या सगळ्या नेत्यांपैकी कुणीही गोंदवलेकर महाराज मठातील ‘कोरोना’ सेंटर रद्द व्हावे अशी मागणी केलेली नव्हती ( Mahavikas Aghadi leaders didn’t opposed to Covid Center at Gondvale ). निलम गोऱ्हे यांचा साताऱ्याशी काहीही संबंध नाही, तरीही त्यांनी हे ‘कोरोना’ सेंटर रद्द करून घेतले. त्यामुळे साताऱ्यातील ‘महाविकास आघाडी’च्या नेत्यांमधूनही संताप व्यक्त होत आहे ( Mahavikas Aghadi leaders angry on Neelam Gorhe ).

निलम गोऱ्हे साताऱ्याच्या मालक झाल्या आहेत का ? असाही सवाल नाव न छापण्याच्या अटीवर एका नेत्याने ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

‘गोंदवलेकर महाराज ट्रस्ट’ने अखेर रूग्णालय सरकारकडे सोपविले, पण अवघ्या 30 खाटांचे

गोंदवलेकर महाराज मंदिरातील कोविड सेंटर रद्द झाल्याने स्थानिक नेत्यांनी शोधले वेगळे पर्याय

गोंदवलेकर महाराज ट्रस्टने ‘कोरोना’साठी रूग्णालय द्यायलाच हवे, निलम गोऱ्हे यांची भूमिका

संतापजनक : 700 बेडचे ‘कोरोना’ रूग्णालय दोन दिवसांत उभे राहणार होते, पण निलम गोऱ्हेंच्या आडमुठेपणामुळे ते रद्द झाले

गोंदवलेकर महाराज ट्रस्टची मुजोरी, बंद पडलेले रुग्णालय सुद्धा ‘कोरोना’ सेंटरसाठी देण्यास विरोध

गोंदवलेकर महाराज चरित्र

निलम गोऱ्हेंच्या चुकीमुळे ‘महाविकास आघाडी’ला राजकीय फटका

माण – खटावमध्ये जयकुमार गोरे हे भाजपचे आमदार आहेत. राजकीयदृष्ट्या अतिशय चाणाक्ष असे हे आमदार आहेत. अलिकडेच त्यांनी मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात आपली भागीदारी घेतली आहे.

‘कोरोना’च्या सुरूवातीलाच जयकुमार गोरे यांनी या वैद्यकीय महाविद्यालयात ‘कोरोना’ सेंटर म्हणून मान्यता मिळविली ( Jaykumar Gore started Covid Center at Mayani ). हे सेंटर राज्य सरकारमार्फत चालविले जात असले तरी त्याचे राजकीय श्रेय आमदार गोरे यांनी मिळविले आहे.

गोंदवले येथील मठात ‘कोरोना’ सेंटर सुरू व्हावे अशी खुद्द ‘महाविकास आघाडी’च्या नेत्यांचीही इच्छा होती ( Mahavikas Aghadi leaders interested to Covid Center at Gondvale ). त्यामुळे संकटात सापडलेल्या लोकांना फायदा झाला असता. पण निलम गोऱ्हे यांनी हे सेंटर हाणून पाडले. त्यामुळे रूग्णांचे मोठे नुकसान झालेच, पण ‘महाविकास आघाडी’च्या नेत्यांचीही पंचाईत झाली.

गोंदवलेकर महाराजांनी प्लेगच्या साथीमध्ये रूग्णसेवा केली होती

गोंदवलेतील 700 बेडचे संभाव्य सेंटर रद्द होताच, लगेचच दुसऱ्या दिवशी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी पुढाकार घेऊन दहिवडी नगरपालिकेमार्फत 75 बेडचे ‘कोरोना’ सेंटर सुरू केले. हे सेंटर कार्यान्वित सुद्धा झाले. त्यामुळे भाजपचे आमदार लोकांसाठी भरपूर प्रयत्न करीत आहेत, पण ‘महाविकास आघाडी’चे नेते जनतेसाठी काहीच करीत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे.

गोंदवले मठाच्या रूग्णालयात आता अवघ्या 30 बेडचे सेंटर उभे राहणार आहे. त्यामुळे ‘महाविकास आघाडी’च्या नेत्यांनी अन्यत्र सेंटर्स सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पण त्याला बराच उशीर होत आहे. तोपर्यंत भाजप आमदार जयकुमार गोरे हे श्रेय घेऊन मोकळे झाले आहेत.

निलम गोऱ्हे यांच्या चुकीच्या कृतीमुळे ‘महाविकास आघाडी’च्या ( Mahavikas Aghadi ) स्थानिक राजकारणालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ‘महाविकास आघाडी’चे नेते गोऱ्हे यांच्याबद्दल संताप व्यक्त करीत आहेत.

गोंदवलेकर महाराज ट्रस्टचे विश्वस्त भाजप व आरएसएस धार्जिणे आहेत. या विश्वस्तांना स्थानिक जनतेविषयी कोणतीही चिंता नाही, असे असताना गोऱ्हे यांनी आपल्याच सरकारविरोधात केलेली कृती संतापजनक असल्याचीही भावना एका नेत्याने व्यक्त केली. सातारा जिल्ह्यात गोऱ्हे यांनी विनाकारण ढवळाढवळ करू नये याची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनीही काळजी घ्यायला पाहीजे, अशीही भावना या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

तुषार खरात

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

3 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

3 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

3 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago