33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजसंतापजनक : 700 बेडचे ‘कोरोना’ रूग्णालय दोन दिवसांत उभे राहणार होते, पण...

संतापजनक : 700 बेडचे ‘कोरोना’ रूग्णालय दोन दिवसांत उभे राहणार होते, पण निलम गोऱ्हेंच्या आडमुठेपणामुळे ते रद्द झाले

गोंदवलेकर महाराज मंदिर परिसरात ‘कोविड सेंटर’ला परवानगी नाकारण्यामागे जातीयवादाची किनार  

टीम लय भारी

मुंबई : माण – खटाव तालुक्यात ( सातारा ) ‘कोरोना’ने कहर माजवला आहे. उपचाराअभावी रूग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणेने तातडीने अंदाजे 700 बेडचे कोविड सेंटर उभारण्याची जय्यत तयारी केली. पण विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या जनहितविरोधी भूमिकेमुळे या कोविड सेंटरची उभारणी रद्द झाली आहे ( Neelam Gorhe canceled Covid center at Gondawalekar Maharaj Temple ).

माण तालुक्यातील गोंदवलेकर महाराज मंदीर ट्रस्टचे भक्त निवास व रूग्णालय या ठिकाणी अंदाजे 700 खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यात येणार होते. भक्त निवासामध्ये इतक्या दर्जेदार सुविधा आहेत की, दोन ते तीनच दिवसांत हे रूग्णालय उभारण्याची तयारी प्रशासनाने केली होती. पण मंदीराच्या विश्वस्तांनी यथेच्छ थयथयाट केला. निलम गोऱ्हे व अन्य पुढाऱ्यांना हाताशी धरून भक्त निवासामधील कोविड सेंटर रद्द करवून घेतले ( Gondawalekar Maharaj trust given wrong information to Neelam Gorhe ).

त्यानंतरही अधिकाऱ्यांनी रूग्णालय ताब्यात घेण्याचा आदेश जारी केला आहे. पण या रूग्णालयात अवघ्या 40 ते 50 खाटांची सुविधा उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली.

ट्रस्टींच्या कोत्या मनोवृत्तीला निलम गोऱ्हे ( Neelam Gorhe’s wrong intention ) यांनी पाठींबा दिला नसता तर या ठिकाणी अंदाजे 700 खाटांचे रूग्णालय उभे राहीले असते. मंदीर परिसरामध्ये भक्त निवासाच्या काही इमारती आहेत. या इमारतींमधील खोल्यांमध्ये खाटा, थंड व गरम पाण्याची सोय, निटनिटके शौचालय अशा अतिशय चांगल्या सुविधा आहेत.

भक्त निवासातील या उत्तम सुविधांमुळे तिथे तात्काळ कोविड सेंटर उभे करणे शक्य आहे. अशा पद्धतीच्या उत्तम सुविधा असलेल्या मोठ्या संख्येच्या खोल्या माण व खटाव तालुक्यात इतरत्र कुठेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे मरणाच्या वाटेवर असलेल्या कोरोना रूग्णांवर उपचार कसे करायचे या चिंतेने अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे ( Corona patient on high risk at Man Khatav ) .

या दोन्ही तालुक्यांत दररोज 200 ते 250 ‘कोरोना’ रूग्ण सापडत आहेत. साधारण दोन हजार कोरोना रूग्ण अक्टीव्ह आहेत. या रूग्णांना बेड मिळावेत म्हणून अधिकाऱ्यांना लोकांचे फोन येत आहेत. पण बेड उपलब्ध करणे शक्य नाही. लोक घरीच उपचार घेत आहेत. घरी उपचार घेतल्यामुळे अन्य लोकांमध्येही संसर्ग वाढत आहे.

आणीबाणीच्या या परिस्थितीत तातडीचा व रास्त उपाय हा गोंदवलेकर महाराज ट्रस्टच्या भक्त निवासाचा वापर करणे हाच आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने अंदाजे 700 बेडचे कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय निलम गोऱ्हे यांनी हाणून पाडल्यामुळे तिथे आता अवघ्या 40 ते 50 खाटांचे टीचभर रूग्णालय उभे करता येईल. पण त्यामुळे माण – खटावची गरज पूर्ण होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

भक्त निवास नाकारण्यामागे जातीय दृष्टीकोन ?

भक्त निवासामुळे साधारण 700 रूग्णांची सोय होईल. गोरगरीब व रंजल्या गांजल्यांची सेवा करण्यात गोंदवलेकर महाराजांनी आपले आयुष्य घालविले. गोंदवले परिसरातील सर्व अठरा पगड जातीच्या लोकांची गोंदवलेकर महाराजांनी सेवा केली. त्यामुळे माण – खटावमधील जनतेमध्ये गोंदवलेकर महाराजांविषयी प्रचंड आस्था आहे. त्यांना घरोघरी पुजले जाते. त्यामुळे दुष्काळी भागातील गोरगरीब रूग्णांना उपचारासाठी भक्त निवास उपलब्ध करून देणे हे गोंदवलेकर महाराजांच्या उदात्त हेतूशी सुसंगत असेच कार्य आहे.

पण मंदिराच्या विश्वस्तांनी गोंदवलेकर महाराजांच्या या हेतूलाच हरताळ फासला आहे. या ट्रस्टने गेल्या काही वर्षांत मंदिराचे यथेच्छ ब्राह्मणीकरण केले आहे. भक्त निवासात मुक्कामी येणारे बहुतांश भक्तगण हे उच्चवर्णीय, उच्चपदस्थ व धनदांडगे असतात. अठरा पगड जातीचे गोरगरीब लोक, शेतकरी यांना या भक्त निवासांत शक्यतो राहण्यासाठी संधी दिली जात नाही.

हे सुद्धा वाचा

गोंदवलेकर महाराज ट्रस्टची मुजोरी, बंद पडलेले रुग्णालय सुद्धा ‘कोरोना’ सेंटरसाठी देण्यास विरोध

उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींसोबत बैठक; ऑक्सिजन, लसीचा पुरवठा वाढविण्याची केली मागणी

धनंजय मुंडेंचा ‘कोरोना’ काळात 35 लाख लोकांना मदतीचा हात

नाना पटोलेंचे देवेंद्र फडणविसांना बोचरे आवाहन

Allow Remdesivir imports, airlift oxygen: Maharashtra CM Uddhav Thackeray urges PM Modi in virtual meeting

अशा परिस्थितीत भक्त निवास ‘कोविड सेंटर’साठी दिल्यास तेथील खोल्यांमध्ये माण – खटावमधील रंजल्या गांजलेल्या – अठरा पगड जातीच्या लोकांचा प्रवेश होईल. या खोल्यांमध्ये अशा मागास लोकांना प्रवेश देण्याची ट्रस्टची इच्छा नाही. त्यांचे उच्चवर्णीय भक्तगण दुखावले जाण्याची शक्यता आहे. एखाद्या रूग्णाचा मृत्यू झाल्यास खोल्या विटाळल्या जातील.

हे सगळे उच्चवर्णीय भक्तांना आवडणार नाही. त्यामुळे रंजली, गांजली मागास जनता ‘कोरोना’मुळे मेली तरी चालेल. पण भक्त निवासातील खोल्या विटाळल्या गेल्या नाही पाहीजेत, असा छुपा हेतू मंदिराच्या विश्वस्तांचा आहे. त्यामुळे त्यांना भक्त निवास कोविड सेंटरसाठी द्यायचे नाही. मंदिराच्या विश्वस्तांचे हे छुपे कारण गोंदवल्यातीलच काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लय भारी’ला सांगितले.

कोविडच्या संकटातही मंदीराचे विश्वस्त छुपेपणाने धर्मांध व जातीयवादी भूमिका घेत आहेत. मनता असलेला जातीयवाद उघडपणे व्यक्त करता येत नाही. त्यासाठी विश्वस्तांनी खोट्या कारणांचा बनाव रचला. गावांतील काही लोकांना भडकावून दिले, अन् निलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) यांना दिशाभूल करणारी माहिती दिली.

इथे कोविड सेंटर उभे राहिले तर गावात ‘कोरोना’चा फैलाव होईल, असे विश्वस्तांनी गावकऱ्यांचे कान भरले. या अपप्रचाराला गावातील काहीजण बळी ठरले, अन् त्यांनी मग कोविड सेंटरचा प्रयत्न हाणून पाडण्याचीच भूमिका घेतली.

मंदिरात काही भाविक आहेत. त्यांना आजार आहे. कोविड सेंटरमुळे या आजारी व वृद्ध लोकांना त्रास होईल असाही बनाव विश्वस्तांनी रचला. मुळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सगळी मंदीरे बंद करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोणत्याही भक्ताला मंदिर व परिसरात प्रवेश नाही. असे असतानाही भक्तांचे कारण पुढे करणे अयोग्य आहे. विशेष म्हणजे, हे कारण सुद्धा खोटे असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. भक्त निवासात राहात असलेल्या लोकांची यादी प्रशासनाने मागितली असता ती यादी देण्याचे सौजन्यही विश्वस्तांनी दाखविले नाही.

भक्त निवास कोविड सेंटरसाठी देण्यास विरोध केल्यानंतर फक्त रूग्णालय ( अंदाजे 50 खाटा ) ताब्यात घेण्याचा निर्णय प्रशासनाने जारी केला. पण हा निर्णयसुद्धा आम्हाला मान्य नसल्याची भूमिका विश्वस्तांनी घेतली. स्थानिक अधिकारी रूग्णालय पाहण्यासाठी गेल्यानंतर तिथे प्रवेश करू देण्यास विश्वस्तांनी हरकत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दुसऱ्या बाजूला मात्र आम्ही रूग्णालयाची जागा देणार असल्याचा प्रचार विश्वस्तांकडून केला जात आहे. असा प्रचार केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र रूग्णालय हस्तांतरीत करण्यासही विश्वस्त व काही गावकऱ्यांचा विरोध असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारने विश्वस्तांची हकालपट्टी करावी

गोंदवलेकर महाराज हे स्थानिक होते. पण त्यांच्या नावाने उभे राहिलेल्या मंदिराच्या विश्वस्तांमध्येही एकाही स्थानिक व्यक्तीला स्थान दिलेले नाही. यापूर्वी गाडगीळ नावाचे विश्वस्त होते. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे ट्रस्टचे कार्य उदात्तपणे वाढविले. पण सध्याच्या विश्वस्तांमध्ये तो उदात्त हेतू व मोठे मन नाही.

पुणे व इतरत्र ठिकाणच्या उच्चवर्णीयांचा विद्यमान ट्रस्टीमध्ये समावेश आहे. ट्रस्टच्या कारभाराविषयी, खर्चाविषयी अथवा धोरणात्मक बाबींविषयी हे विश्वस्त स्थानिकांना काहीही माहिती होवू देत नाहीत.

या विश्वस्तांनी गोंदवलेकर महाराज मंदीराचे यथेच्छ ब्राह्मणीकरण केले आहे. ट्रस्टमधील सगळे उच्चपदस्थ उच्चवर्णीय असून ते आरएसएसधार्जिणे आहेत. बहुजन समाज हा फक्त भक्त म्हणूनच या ठिकाणी येत असतो. मंदिराच्या निधीचा वापर माण – खटावच्या बाहेरील उच्चवर्णीयांच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या जातीयवादी ट्रस्टमधील व्यक्तींची सरकारने हकालपट्टी करावी. सिद्धीविनायक मंदीर, साईबाबा मंदीर ट्रस्टच्या धर्तीवर राज्य सरकारने आपले प्रतिनिधी नियुक्त करावेत. स्थानिक गावकऱ्यांना ट्रस्टमध्ये घ्यावे. त्यामुळे या मंदिराचा व निधीचा वापर खऱ्या अर्थाने गोरगरीब, रंजले – गांजलेल्या जनतेसाठी होईल.

मंदिराच्या ट्रस्टमध्ये आलेला पैसा कुठे व कुणासाठी खर्च केला जातो याचीही तपासणी सरकारने करावी. त्यातूनही ट्रस्टचा जातीयवादी चेहरा आणखी स्पष्ट होऊ शकेल. कोविड काळात या ट्रस्टने मुख्यमंत्री फंडासाठी निधी दिला आहे का ? केंद्र सरकारला किती निधी दिला आहे, याचाही तपास करावा. त्यातूनही विश्वस्तांचे ‘खायचे दात, अन् दाखवायचे दात’ दिसतील अशीही मागणी गावकऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लय भारी’शी बोलताना केली.

भक्त निवासामध्ये कोणाला प्रवेश दिला जातो, खोल्यांचे वापर करणारे लाभार्थी भक्तगण कोण आहेत, याचीही चौकशी सरकारने करावी. त्यातून बरीच बडी धेंडे व जातीयवादी चेहरे समोर येतील, असेही या सूत्रांनी सांगितले.

भक्तांसाठीही उपचार करण्यास ट्रस्टींचा विरोध

माण खटावमधील ‘कोरोना’चा संसर्ग झालेल्या जनतेसाठी तुम्ही जागा देवू नका. पण राज्यभरात तुमचे जे भक्तगण आहेत, त्यांना कोरोना झाला तर त्यांच्या उपचारासाठी तरी जागा द्या, अशी विनंती अधिकाऱ्यांनी केली. पण त्यावरही विश्वस्तांनी कडाडून विरोध केल्याचे सूत्रांनी सांगितले ( Gondwalekar Maharaj trust reluctant to set up Covid Center for Man Khatav ).

निलम गोऱ्हेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत

मंदीर, देव याबाबत प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार सर्वश्रृत आहेत. हे विचार निलम गोऱ्हे यांनी वाचावेत ( Neelam Gorhe should read thoughts of Prabodankar Thackeray ). हे विचार वाचल्यानंतर गोंदवलेकर महाराज मंदीराच्या भक्त निवासाचा वापर रूग्णालयासाठी व्हावा की नाही याचे आकलन त्यांना होईल, असा सल्ला माण – खटावमधील नागरिकांनी गोऱ्हे यांना दिला आहे.

गोंदवल्यात कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू

गोंदवले गावात ‘कोरोना’च्या संसर्गामुळे गेल्या काही दिवसांत सात जणांचे मृत्यू झाले आहेत. प्रशासनाने प्रस्तावित केलेले कोविड सेंटर वेळेत उभे राहिले असते तर यांतील काहीजणांचे प्राण वाचले असते. परिसरातील अन्य मृत्यू झालेल्यांचेही प्राण वाचले असते. पण तिथे कोविड सेंटर उभारण्यासाठी ट्रस्टीच्या थयाथयाटामुळे दिरंगाई झाली, अन् शेवटी निलम गोऱ्हे यांनी कोविड सेंटर हाणून पाडले ( Neelam Gorhe against for Covid center ). त्यामुळे लोकांचे प्राण गेले. त्यामुळे निलम गोऱ्हे व मंदिराच्या ट्रस्टींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी संतप्त भावना माण – खटावमधील जनतेमधून व्यक्त केली जात आहे ( Government should filed complaint against Neelam Gorhe ).

साताऱ्यातील कोविड सेंटर रद्द करण्यात निलम गोऱ्हेंना स्वारस्य का ?

माण – खटाव, कोरेगाव, फलटण या परिसरातील अनेक मातब्बर पुढारी महाविकास आघाडी सरकारमध्ये आहेत. लोकं मरणाच्या वाटेवर असताना गोंदवलेकर महाराज मंदिराच्या भक्त निवासाचा कोविड सेंटरसाठी वापर करा, अशी स्थानिक लोकप्रतिनिधींचीही भूमिका आहे. निलम गोऱ्हे यांच्यापेक्षाही उच्चपदस्थ लोकप्रतिनिधी या परिसरात आहेत. यांतील कुणीही हे सेंटर रद्द व्हावे म्हणून सरकारकडे मागणी केलेली नाही. परंतु पुणे निवासी असलेल्या निलम गोऱ्हे यांनी माण – खटावमधील हे कोविड सेंटर रद्द करण्यात इतके का स्वारस्य दाखविले. दुष्काळी भागातील गोरगरीब जनतेपेक्षा त्यांना विश्वस्तांचे हीत महत्वाचे वाटते का असाही सवाल स्थानिक लोकांनी केला आहे ( Why Neelam Gorhe interested to cancel the covid center at Gondawalekar Maharaj trust ).

समर्थकांची लंगडी भूमिका

गोंदवलेकर महाराज मंदिराच्या भक्त निवासामधील प्रस्तावित कोविड सेंटर रद्द झाल्यानंतर ‘लय भारी’ने वाचा फोडली. त्यावर ट्रस्ट समर्थकांनी व गोऱ्हे समर्थकांनी ‘लय भारी’ विरोधात अपप्रचार करणारे मेसेज ‘अंध भक्त स्टाईल’ने पसरवायला सुरूवात केली आहे. मंदिराकडून हॉस्पीटल चालविले जाते, अन्नछत्र राबविले जाते, निलमताई गोऱ्हे यांचे कार्य महान आहे, ट्रस्टचे कार्य चांगले आहे, अशी सारवासारव करणारे मेसेज व्हायरल केले जात आहेत.

पण अन्नछत्र चालविणे, गोरगरीबांची सेवा करणे हे उदात्त कार्य खुद्द गोंदवलेकर महाराज यांनीच सुरू केलेले होते. ती परंपरा चालू ठेवणे हे विश्वस्तांचे नैतिक जबाबदारीच आहे. शिवाय आलेला पैसा हा जनतेचा आहे. त्यामुळे ट्रस्ट जनतेवर कोणताही उपकार करीत नाही.

महत्वाचे म्हणजे, लोक संकटात असताना जातीयवादी व धर्मभोळी भावना मनात ठेवून कोविड सेंटर उभारू देण्यास विश्वस्तांनी कडाडून विरोध करणे हे खुद्द गोंदवलेकर महाराजाच्या कार्यालाच हरताळ फासणारी भूमिका आहे. गोंदवलेकर महाराजांचे अठरापगड जातीमध्ये भक्तगण आहेत. असे असताना केवळ उच्चवर्णीयांचेच वर्चस्व ट्रस्टमध्ये का ठेवले आहे. महाराज गोंदवले गावचेच रहिवासी होते. तरीही या गावातील एकाही व्यक्तीचा ट्रस्टमध्ये का समावेश नाही ?. निलम गोऱ्हेंनी संकटातील लोकांचा विचार करण्याऐवजी जातीयवादी विश्वस्तांची तळी का उचलली, माण – खटावमधील ‘महाविकास आघाडी’च्या नेत्यांना डावलून निलम गोऱ्हे यांनी हे कोविड सेंटर रद्द करण्यासाठी इतकी उठाठेव का केली असे अनेक प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी