33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रगोंदवलेकर महाराज ट्रस्टची मुजोरी, बंद पडलेले रुग्णालय सुद्धा ‘कोरोना’ सेंटरसाठी देण्यास विरोध

गोंदवलेकर महाराज ट्रस्टची मुजोरी, बंद पडलेले रुग्णालय सुद्धा ‘कोरोना’ सेंटरसाठी देण्यास विरोध

टीम लय भारी

मुंबई : ‘मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे’ असे म्हटले जाते. पण ‘कोरोना’ संकटात सापडलेल्या रूग्णांना आरोग्यसेवा देण्यासाठी विरोध करण्याचा करंटेपणा सातारा जिल्ह्यातील ( तालुका माण ) ‘गोंदवलेकर महाराज ट्रस्ट’ने केला आहे ( Neelam Gorhe taken stand against Covid center ) .

संतापजनक म्हणजे, मंदिर ट्रस्टची ही चुकीची भूमिका विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी उचलून धरली आहे. आपल्या उच्च पदाचा गैरवापर करून निलम गोऱ्हे यांनी संकटात सापडलेल्या गोरगरीब रूग्णांना मरणाच्या दाढेत ढकलून दिले आहे ( Neelam Gorhe act against people in Corona pandemic).

‘कोरोना’च्या या संकटकाळात आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला त्यांच्याच पक्षाच्या नेत्या निलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) यांनी कोलदांडा घातला आहे ( Neelam Gorhe taken stand against Uddhav Thackeray’s policy ).

गोंदवलेकर महाराज मंदीर हे बऱ्यापैकी गडगंज संपत्ती असलेले मंदीर आहे. भक्तांनी दिलेल्या देणग्यांमधून या मंदिराकडे संपत्ती आलेली आहे. ट्रस्टकडे भक्त निवास, भोजन व्यवस्था व रूग्णालय ( ते सध्या बंद आहे ) असा मोठा परिसर आहे.

माण – खटावमध्ये दररोज 200 ते 250 कोरोना रूग्ण सापडत आहेत. आजच्या घडीला एकूण 2000 संख्येच्या वर रूग्ण माण व खटाव तालुक्यात आहेत. त्यामुळे जिल्हा व तालुका प्रशासनाने नवीन कोविड सेंटर्स स्थापण्यासाठी काही ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यात गोंदवलेकर महाराज ट्रस्टचे भक्त निवास व रूग्णालय अधिगृहीत करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

हर्षवर्धन पाटलांच्या कन्येने हातात झाडू घेऊन साफसफाई केली, अन् तिथे कोविड सेंटर उभारले

उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींसोबत बैठक; ऑक्सिजन, लसीचा पुरवठा वाढविण्याची केली मागणी

धनंजय मुंडेंचा ‘कोरोना’ काळात 35 लाख लोकांना मदतीचा हात

CORONAVIRUS IN MUMBAI

कोविड सेंटरसाठी जे निकष आवश्यक आहेत, त्याती बहुतांश पूर्तता मंदीराचे रूग्णालय, भक्त निवास व भोजन कक्षामुळे पूर्ण होत आहे. अशी सुसज्ज सुविधा माण – खटावमध्ये अन्यत्र कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासनाने या ट्रस्टच्या जागेत कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. पण निलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) यांच्या आडमुठेपणामुळे कोविड सेंटर उभारण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.

गोंदवलेकर महाराज मंदीर जरी दुष्काळी माण तालुक्यात असले तरी या ट्रस्टमध्ये पुणे व इतर भागातील लोकांचा समावेश आहे. प्रशासनाने मंदिराचा भाग ‘कोविड’ सेंटरसाठी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर या ट्रस्टच्या काही मंडळींनी थयथयाट सुरू केला.

आमचे भक्त जगभरात आहेत. इथे कोविड सेंटर होऊच देणार नाही, अशा धमक्या ट्रस्टींनी अधिकाऱ्यांना द्यायला सुरूवात केली. निलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) व अन्य काही लोकप्रतिनिधींकडे जाऊन या ट्रस्टच्या लोकांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणायला सुरूवात केली.

ट्रस्टमधील मंडळींनी गावातील लोकांना भडकावले. मंदिर परिसरात कोविड सेंटर उभे राहिल्यामुळे गावात ‘कोरोना’चा फैलाव होईल, अशी नाहक भीती या ट्रस्टच्या मंडळींनी गावकऱ्यांमध्ये पसरवली. मंदीर गर्दीच्या ठिकाणी आहे, अशी पुस्तीही जोडली.

वास्तविक, मुंबई – पुण्यातील रूग्णालये गर्दीच्या ठिकाणीच आहेत. असे असताना या रूग्णालयांतून बाजूच्या लोकवस्तीत ‘कोरोना’चा फैलाव झाल्याचे एकही उदाहरण नाही. परंतु निलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) यांनी या गैरलागू मुद्द्यावरच बोट ठेवल्याचे दिसत आहे.

मंदीराच्या आतमध्ये भक्तगण राहतात, व ते आजारी आहेत. कोविड सेंटर उभे राहिल्यास या आजारी भक्तांना त्रास होईल, अशी आवई सुद्धा ट्रस्टींनी उठविली. या आजारी भक्तांची यादी प्रशासनाने मागितली असता, एकाही भक्ताचे नाव ट्रस्टकडून दिलेले नाही.

मंदिराचे ठिकाण वगळून बॅरिक्रेड्सचा वापर करून भक्त निवास व रूग्णालयात कोविड सेंटर उभारण्यात येणार होते. परंतु या ठिकाणी कोविड सेंटर उभारल्यास भक्तांच्या भावना दुखावल्या जातील, विटाळ होईल अशाही अफवा पसरविण्यात आल्या.

Neelam Gorhe taken stand against Covid center
निलम गोऱ्हे यांनी आरएसएसधार्जिण्या ट्रस्टवर मेहरबानी दाखविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

एका बाजूला गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या हयातीत जनसेवा कशी केली त्याची प्रवचने सांगितली जातात. पण दुसऱ्या बाजूला संकटाच्या काळात रुग्णांना जागा द्यायची वेळ आल्यानंतर ट्रस्टने राजकीय नेते व गावकऱ्यांना भडकावून अधिकाऱ्यांवर दबाव आणला आहे.

गोऱ्हे ( Neelam Gorhe ) व इतर राजकीय पुढाऱ्यांनी दबाव आणल्यानंतर गोंदवलेकर महाराज ट्रस्टमधील भोजन कक्ष व भक्त निवास वगळून रूग्णालयामध्ये कोविड सेंटर उभारण्याचा सुधारित निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु या रूग्णालयातही ‘कोविंड सेंटर’ उभारण्यास ट्रस्टने विरोध केल्याची माहिती सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

आरएसएसधार्जिण्या ट्रस्टबद्दल निलम गोऱ्हेंना एवढा पुळका का ?

गोंदवलेकर महाराज ट्रस्टमध्ये माण – खटाव तालुक्याच्या बाहेरचे उच्चवर्णीय लोक आहेत. या उच्चवर्णीयांनी गावातील एकाही व्यक्तीला ट्रस्टमध्ये घेण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. ट्रस्टमधील मोजके उपरे लोक मंदीराचे सगळे धोरणात्मक निर्णय घेतात. ट्रस्ट हे पूर्णत: आरएसएसधार्जिणे आहे. या आरएसएसधार्जिण्या ट्रस्टबद्दल निलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) यांना एवढा पुळका का असा सवाल स्थानिक लोकांनी ‘लय भारी’शी बोलताना केला.

याबाबत स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला असता, मंदिर ट्रस्टने कोरोना काळात सरकारला आर्थिक मदत केली आहे. लोकांना धान्य वाटपही केले आहे. परंतु मंदिर परिसरात कोरोना सेंटर निर्माण करण्यास ट्रस्टचा व काही गावकऱ्यांचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

आमचा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी