32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यगोंदवलेकर महाराज ट्रस्टने ‘कोरोना’साठी रूग्णालय द्यायलाच हवे, निलम गोऱ्हे यांची भूमिका

गोंदवलेकर महाराज ट्रस्टने ‘कोरोना’साठी रूग्णालय द्यायलाच हवे, निलम गोऱ्हे यांची भूमिका

माण – खटावच्या जनतेसाठी 50 लाख रुपये निधी देण्याची तयारी

टीम लय भारी

मुंबई :  ‘गोंदवलेकर महाराज ट्रस्ट’ने त्यांचे बंद असलेले रूग्णालय ‘कोरोना’ रूग्णांसाठी द्यायलाच हवे अशी, नमती भूमिका विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा निलम गोऱ्हे यांनी घेतली आहे ( Neelam Gorhe said, Gondvlekar trust should start Covid center ).

गोंदवलेकर महाराज ट्रस्टच्या जागेत 700 खाटांचे रूग्णालय निलम गोऱ्हे यांच्या चुकीच्या भुमिकेमुळे रद्द झाल्याचा प्रकार ‘लय भारी’ने चव्हाट्यावर आणला ( Neelam Gorhe canceld Covid center ). एवढेच नव्हे तर, ट्रस्टची मुजोरी आणि गोऱ्हे यांची चुकीची भूमिका यावर ‘लय भारी’ने गेल्या तीन दिवसांपासून बातम्यांची मालिका सुरू केली. त्या पार्श्वभूमीवर गोऱ्हे यांनी ‘लय भारी’कडे ( Neelam Gorhe spoke with Lay Bhari ) सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली.

ट्रस्टने त्यांचे बंद असलेले रूग्णालय ‘कोरोना’ सेंटरसाठी देणार असल्याचे मला सांगितले आहे ( Neelam Gorhe said, Gondvlekar Maharaj trust will handover hospital to govt ). त्यामुळे तिथे 200 खाटांची सोय होईल. (वास्तविक, साधारण 50 खाटांचीच सोय होण्याची शक्यता आहे). मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले आहे. ट्रस्ट आपले रूग्णालय द्यायला तयार झालेले आहे. ट्रस्टकडून रूग्णालयासाठी सुद्धा विरोध केला जाणार असेल तर ते मलाही मान्य नसेल, असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.

Neelam Gorhe canceled Covid center at Gondawalekar Maharaj Temple
गोंदवलेकर महाराज भक्त निवासातील कोविड सेंटर निलम गोऱ्हे यांनी रद्द केले आहे

ट्रस्टने रूग्णालय दिल्यानंतरही तिथे 40 ते 50 खाटांचीच सोय होणार आहे. वास्तविक तिथे 700 खाटांचे कोरोना सेंटर उभे राहणार होते. पण तुमच्या चुकीमुळे ते रद्द झाल्याचे ‘लय भारी’ने गोऱ्हे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर तूर्त हे रूग्णालय तरी सरकारने ताब्यात घेऊन तिथे उपचार सुरू करावेत. त्यानंतर किती खाटांची गरज आहे, यावर आपल्याला पुढे निर्णय घेता येईल, असे गोऱ्हे म्हणाल्या.

गोंदवलेकर महाराज ट्रस्टचे रूग्णालय तातडीने ताब्यात घेऊन तिथे उपचार सुरू करण्यास तुम्ही – आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करूयात, असेही गोऱ्हे म्हणाल्या.

गोंदवले परिसरातील ‘कोरोना’ रूग्णांसाठी माझ्या फंडातून 50 लाखापर्यंतचा निधी देण्यास तयार आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी निधीची गरज असल्याची मला माहिती दिली, तर मी याबाबत निर्णय घेईन, अशा त्या म्हणाल्या. गोंदवलेकर महाराज ट्रस्टनेही ‘कोरोना’ रूग्णांवर उपचार करण्यासाठी निधी देण्यास मी सांगेन, अशाही त्या म्हणाल्या.

निलम गोऱ्हे माण तालुक्यासाठी रूग्णवाहिका देणार होत्या, पण वर्षानंतरही दिली नाही

चेतना सिन्हा यांच्या माणदेश फाऊंडेशन या संस्थेमार्फत गोंदवलेत गेल्या वर्षी ‘कोरोना’ सेंटर सुरू झाले. त्याचे उद्घाटन निलम गोऱ्हे यांनी केले होते. या उद्घाटनाप्रसंगी ‘आपण एक रूग्णवाहिका देऊ’ असे आश्वासन निलम गोऱ्हे यांनी दिले होते. पण ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे निधी देण्याबाबतचे नवे आश्वासन त्या कितपत पाळतील, याविषयी शंकाच असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

गोंदवलेकर महाराज मंदीर ट्रस्टकडून पीएम केअर फंडाला 50 लाख, सीएम फंडाला मात्र घंटा, तरीही निलम गोऱ्हेंचा ट्रस्टवर वरदहस्त !

संतापजनक : 700 बेडचे ‘कोरोना’ रूग्णालय दोन दिवसांत उभे राहणार होते, पण निलम गोऱ्हेंच्या आडमुठेपणामुळे ते रद्द झाले

गोंदवलेकर महाराज ट्रस्टची मुजोरी, बंद पडलेले रुग्णालय सुद्धा ‘कोरोना’ सेंटरसाठी देण्यास विरोध

संजय राऊत ने सीबीआयपे साधा निशाणा

रामराजे नाईक निंबाळकर आले मदतीसाठी धावून

निलम गोऱ्हे यांच्यामुळे 700 खाटांचे ‘कोरोना’ सेंटर रद्द झाले आहे. माण – खटावमध्ये कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत हे संभाव्य कोरोना सेंटर रद्द झाल्यामुळे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींची पाचावर धारण बसली आहे.

अशा परिस्थितीत विधानपरिषदेचे सभापती व साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर मदतीसाठी धावून आले आहेत. निंबाळकर यांच्या संस्थेची एक शाळा गोंदवलेमध्ये आहे. ही शाळा ‘कोरोना’ रूग्णालयासाठी देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे ( Ramraje Naik Nimbalkar will start covid center at Gondvle ). ऑक्सीजन, रेमडेसीवीर इंजेक्शनचा गरजेनुसार पुरवठा करण्याची तयारीही निंबाळकर यांनी दर्शविली आहे.

रूग्णालयाची चावी देण्यास ट्रस्टची खळखळ

गोंदवलेकर महाराज ट्रस्टचे रूग्णालय सध्या बंद आहे. हे बंद असलेले रूग्णालय ताब्यात घेण्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे. त्यानुसार आरोग्य अधिकारी शनिवारी रूग्णालयात गेले होते. पण रूग्णालयाची चावी घेऊन कर्मचारी पसार झाले होते. अधिकाऱ्यांनी तासभर वाट पाहून तिथून निघून गेले. ट्रस्टने रूग्णालयाची चावी तातडीने आरोग्य अधिकाऱ्यांकडे द्यावी, यासाठी निलम गोऱ्हे यांच्या कार्यालयातूनही पाठपुरावा केला जात आहे. ‘लय भारी’ने बातम्यांचा सपाटा लावल्यानंतर निलम गोऱ्हे यांनीही ट्रस्टच्या चुकांना पाठींबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रूग्णालय तरी कोरोना रूग्णांसाठी द्यायची वेळ ट्रस्टवर आली आहे. वास्तवात, हे रूग्णालय देण्याचीही ट्रस्टची इच्छा नाही. त्यासाठीच रूग्णालयाची चावी घेऊन कर्मचारी पसार झाले होते, असे सूत्रांनी सांगितले.

ट्रस्टमधील जातीयवादाविरोधात भूमिका घेऊ : निलम गोऱ्हे

गोंदवलेकर महाराज ट्रस्टकडून जातीयवादी कृत्ये होत असल्याचे मला माहित नव्हते. पण असे प्रकार होत असतील तर त्याची माहिती मला द्यावी. मी स्वतः त्याविरोधात भूमिका घेईन, असेही निलम गोऱ्हे ‘लय भारी’शी बोलताना म्हणाल्या.

गोंदवलेमध्ये ‘कोरोना’चा कहर, गाव संपूर्ण बंद

गोंदवले व परिसरामध्ये कोरोनाने कहर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन समितीने वैद्यकीय सेवा वगळून संपूर्ण गाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी