टॉप न्यूज

काय आहे पेगासस स्पायवेयर आणि ते कसे काम करते?

टीम लय भारी

मुंबई :- कालपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेले पेगासस स्पायवेयर हे एका एनएसओ नावाच्या इस्रायली कंपनीचे सॉफ्टवेअर आहे. जे छुप्या पद्धतीने काही ठराविक माणसांच्या मोबाईल मधील माहितीची चोरी करते. परंतु ही माहिती फक्त सरकार, गुप्तचर यंत्रणा यांनाच उपलब्ध होते असे एन एस ओ कडून सांगितले गेले (Pegasus spyware and how it works).

भारतीय सरकारने यात आपला काहीही हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. याउपर या विषयी चर्चा करण्यासाठी सोमवारी एक बैठक घेतली जाईल असे भारत सरकारने सांगितले. पेगाससच्या डेटाबेस वर 50,000 हुन अधिक फोन नंबर असल्याचे कळते. त्यात साधारण 300 फोन नंबर हे भारतीय आहेत.

मुंबईत पावसाने घातले थैमान; लोकांचे जनजीवन विस्कळीत

पहिल्या वनडेत भारताचा 7 गडी राखत श्रीलंकेवर दणदणीत विजय…

पेगासस हे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती मिळवण्यासाठी अस्तीत्वात नाही. आतंकवाद्यांचा व दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी तयार केले गेलेले स्पायवेयर आहे व त्याची माहिती फक्त गुप्तचर संस्था आणि सरकारलाच उपलब्ध होते. असे म्हणत एस एन ओ च्या सदस्यांनी काहीतरी चुकीचे केल्याचे आरोप धुडकावून लावले (In saying this, the members of SNO refuted the allegation that they had done something wrong.).

भारतीय फोन नंबरच्या यादीत आतापर्यंत 40 हुन अधिक पत्रकार तसेच 3 विरोधी पक्षनेते व 2 मोदी सरकारचे मंत्री आहेत असे समजते. या उपर आणखी किती आणि कोणाची माहिती उपलब्ध झाली आहे हे अजून अज्ञात आहे. फॉरेन्सिक टेस्टच्या अनुसार यापैकी 37 मोबाईल मधून माहितीची चोरी करण्यात पेगासस स्पायवेयरला यश आले आहे (Pegasus spyware has succeeded in stealing information from mobiles).

पेगासस स्पायवेयर

मी उत्तर द्यायला तयार आहे, उत्तरे देण्याची सरकारला संधीही द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी

भास्कर एक्सप्लेनर:पेगासस स्पायवेयर से भारत के 40 से ज्यादा पत्रकारों की जासूसी का दावा, जानिए इस स्पायवेयर के बारे में सबकुछ

हे स्पायवेयर अँड्रॉइड तसेच आयफोन मधील अधिक सुरक्षितता असताना देखील इन्स्टॉल केले जाऊ शकते. तसेच या स्पायवेयर मधून फोटो, व्हिडीओ, फोन कॉल्सचे रेकॉर्डिंग, इमेल, सगळ्या प्रकारचे पासवर्ड चोरी केले जाऊ शकतात. तसेच गुप्त पद्धतीने मोबाईलचा माईक ऍक्टिवेट केला जाऊ शकतो.

एनएसओ म्हणाले, “आमच्या सर्व्हरवरून हा डेटा लीक झाल्याचा दावा संपूर्णपणे खोटे आणि हास्यास्पद आहे, कारण असा डेटा आमच्या सर्व सर्व्हरवर कधीच अस्तित्वात नव्हता.”

पेगासस स्पायवेयर हे वेब लिंक किंवा मिसकॉल वरून आपल्या फोन मध्ये शिरकाव करू शकते व सगळ्या प्रकारची माहिती छुप्या पद्धतीने चोरू शकते. एकदा का या स्पायवेयरचा शिरकाव आपल्या फोन मध्ये झाला की तो फोन टाकून दिल्याशिवाय गत्यंतर उरत नाही.

Rasika Jadhav

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

12 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

13 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले…

13 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

14 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस…

15 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

16 hours ago