30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमुंबईमुंबईत पावसाने घातले थैमान; लोकांचे जनजीवन विस्कळीत

मुंबईत पावसाने घातले थैमान; लोकांचे जनजीवन विस्कळीत

टीम लय भारी

मुंबई :- मुंबई, ठाणे व पालघर भागात पावसाने थैमान घातला आहे. बाहेर पडणाऱ्या हौशी पर्यटकांसाहित घरात थांबणाऱ्या सुज्ञ नागरिकांना सुद्धा या पावसामुळे बरेच मोठे नुकसान भोगावे लागले आहे (Rains disrupt life in Mumbai).

ठाण्यातील विक्रोळी भागात झालेल्या भूस्खलनामुळे घरात अडकलेल्या लोकांचे 23 बळी गेल्याचे समोर येत आहे, तसेच सीबीडी परिसरात फिरायला गेलेल्या हौशी ट्रेकर्सना अग्निशमन दलाने मदत करून सुखरूप धोक्याच्या बाहेर काढले आहे.

मी उत्तर द्यायला तयार आहे, उत्तरे देण्याची सरकारला संधीही द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहिल्या वनडेत भारताचा 7 गडी राखत श्रीलंकेवर दणदणीत विजय…

रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. कल्याण ते ठाणे दरम्यान मध्य रेल्वे काही काळासाठी बंद करण्यात आलेली आहे. रुळांवर पाणी साचले आहेच परंतु मध्य रेल्वेच्या काही स्टेशनवर प्लॅटफॉर्म पर्यंत पाणी चढले आहे त्यामुळे धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे (A dangerous situation has arisen).

मिठी नदीला धोका उत्पन्न झाला आहे. मिठी नदीचा धोका दर्शवणारे नियम 3.3 पाणी झाले की धोकादायक म्हणून सांगितले जाते. परंतु मिठी नदीचे पाणी 4.2 पर्यंत वाढले आहे. तिथल्या वस्त्या पालिकेने उठवल्या आहेत आणि त्यांना पालिकेच्या शाळांमध्ये पाठवण्यात आलेले आहे.

Rains disrupt life in Mumbai
मुंबईत मुसळधार पाऊस

भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य नाही; नवाब मलिक

Mumbai Rains LIVE Updates: IMD issues red alert for Mumbai, Thane and Palghar

पालघर जिल्ह्यात सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नुकसान झालेले आहे. 40 गॅसची सिलिंडर पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत तसेच कार खेळण्यातल्या गाड्यांसाख्या रस्त्यावरून वाहताना दिसत आहेत.

ठाणे भागात एक 40 वर्षाचा माणूस झाड कोसळल्यामुळे गंभीर अवस्थेत आहे. तर त्याच झाडाचा फटका 5 चारचाकी गाड्या आणि अन्य वाहनांना बसलेला आहे. उल्हासनगर येथील एक 4 वर्षाचे लहान मूल सुद्धा वाहून गेले आहे. एका 16 वर्षाच्या मुलांचाही या पावसामुळे मृत्यू झाल्याचे समजते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी