33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयमी उत्तर द्यायला तयार आहे, उत्तरे देण्याची सरकारला संधीही द्या; पंतप्रधान नरेंद्र...

मी उत्तर द्यायला तयार आहे, उत्तरे देण्याची सरकारला संधीही द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी

टीम लय भारी

दिल्ली :- संसदेचे पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पावसाळी अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. कोरोनाची लस घ्या आणि बाहुबली बना, असे आवाहन देशवासियांना करतानाच संसदेत कळीचे प्रश्न विचारा. पण उत्तरे देण्याची सरकारला संधीही द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केले आहे (Prime Minister Narendra Modi has made such an appeal to the opposition).

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी सभागृहात सहकार्य करा. आपण बाहुवर व्हॅक्सिन घेतली आहे. बाहुवर व्हॅक्सिन घेतल्याने तुम्ही बाहुबली बनता. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी बाहुबली बनण्याचा हा एकमेव उपाय आहे. बाहुवर लस घेणे हाच पर्याय आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणे शक्य नाही; नवाब मलिक

मोदी हटाव देश बचाव, पृथ्वीराज चव्हाणांचा सायकल रॅलीत नारा

सभागृहाचे कामकाज परिणामकारक झाले पाहिजे. सार्थक चर्चा झाली पाहिजे. देशातील लोकांना जी उत्तरे हवी आहेत. सरकार त्याची उत्तरे द्यायला तयार आहे. त्यामुळे सर्व खासदारांनी आणि राजकीय पक्षांनी कठोर प्रश्न विचारावेत, प्रत्येक प्रश्न विचारावा. पण शांत वातावरणात प्रश्न विचारावे. तसेच सरकारला उत्तरे देण्याची संधीही द्यावी. कारण जनतेची प्रश्न सुटले पाहिजे, असेही मोदी म्हणाले (Because the question of the people should be solved, said Modi).

Prime Minister Narendra Modi has made such an appeal
पंतप्रधान नरेंद्र मोदी

जयंत पाटीलांनी सांगितले मोदींच्या आणि पवारांच्या भेटीचे नेमकं कारण

“Treat Ministers As Introduced”: PM, Interrupted By Parliament Protests

आतापर्यंत 40 कोटीहून अधिक लोक कोरोना विरोधात बाहुबली बनले आहेत. संपूर्ण जगाला या महामारीने घेरले आहे. मानव जातीला घेरले आहे. त्यामुळे संसदेत या संदर्भात चर्चा व्हावी. प्राधान्याने त्यावर चर्चा व्हावी, व्यवहारी सूचना याव्यात. त्यामुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठी नव्याने उभे राहता येईल. काही चुका असतील तर त्या दुरुस्त करता येईल, असे आवाहनही मोदींनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी