टॉप न्यूज

पॉर्न फिल्मप्रकरणी राज कुंद्राबरोबर परप्रांतीय उमेश कामत आरोपी, बदनामी मात्र मराठमोळ्या उमेश कामतची !

टीम लय भारी

मुंबई  : काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा (Raj kundra) यांना बेकायदेशीर रित्या अश्लिल चित्रफीत बनवणे आणि प्रसारित करणे याअंतर्गत पोलिसांनी अटक केली आहे. तसेच 23 जुलै पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. राज कुंद्रासोबत अजून बारा जणांना या प्रसंगी चौकशीला सामोरे जावे लागले आहे. (Police arrested raj kundra for making and publishing pornographic content)

या प्रकरणाची चौकशी करताना राज कुंद्रा यांच्या माजी पीए यांच्यासोबत चे व्हाट्सएप संभाषण समोर आले आहे. त्यांच्या या पीए चे नाव सुद्धा उमेश कामत होते. त्यावरून काही प्रसारमाध्यमांनी मराठी अभिनेता उमेश कामत यांचे फोटो राज कुंद्रासोबत जोडले. (Some media organizations used a photograph of marathi actor umesh kamat without confirming)

‘चिपळूण शहराने पहिल्यांदाच पाहिला महाभयंकर पूर’

टिक टॉक चा भारतात पुन्हा प्रवेश? या वर्षाअखेरीस चिनी ऍप टिक टॉक भारतात पुनः धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज

कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता कुणाचेही नाव कशाहीसोबत जोडले जाणे प्रसारमाध्यमांच्या हिताचे नसते. हे पत्रकारितेच्या तत्वात बसत नाही. बातमीदारावर, संपादकावर तसेच माध्यमावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. (A complaint can be filled against media organization by umesh kamat)

या घटनेवरून मराठी अभिनेता उमेश कामत याने तीव्र नाराजी व्यक्त करीत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे. (Umesh kamat tweeted about the incident and aslo shared his view on Instagram)

उमेश कामत

सदर केसमध्ये डिफेमेशन), प्रायव्हसी इन्व्हेशन व राईट ऑफ पब्लिसिटी अंतर्गत तक्रार नोंदवता येते. जर एखाद्या व्यक्तीने/संस्थेने चुकीचे किंवा आक्षेपार्हपणे आपले चित्रण केले किंवा छापले तर आपल्याला कारवाई करण्याचा अधिकार आहे. एखाद्या अश्लील वेबसाइटवर पृष्ठ स्थापित करण्यासाठी आपले छायाचित्र वापरणे हेही या प्रायव्हसी इन्व्हेशन अंतर्गत येते.

वापर केली गेलेली प्रतिमा आपल्या प्रतिष्ठेला हानी पोहचवेल किंवा आपली चुकीची छाप प्रदान करेल तेव्हा बदनामी मुळे गुन्हा नोंदवता येतो. एखादी व्यक्ती किंवा कंपनी जेव्हा एखादा फोटो किंवा व्हिडिओ वापरुन एखादा गुन्हा केला आहे असे दाखवते तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला किंवा आपल्या व्यवसायाला होतो तेव्हा बदनामी सिद्ध होते. (The same case can be filed under defamation)

भारतीय राज्यघटनेच्या अनुछेद (article 19) मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की “लाजिरवाणे, मानसिकरित्या क्लेशकारक” किंवा एखाद्या व्यक्तीच्या कार्यात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारे असा फोटो प्रकाशित करणे घटनेचे कलम २१ मध्ये बेकायदेशीर आहे. घटनेचा कलम २१ सर्व नागरिकांना जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्काची हमी देतो आणि या अधिकाराचा उपयोग करता येतो. (Indian Constitution have explained about such incidents)

जंगली प्राण्यांची पुजा करणारी ठाणे-पालघरमधील आदिवासी संस्कृती; परदेशी विद्यापीठाकडून होतेय संशोधन

Marathi actor Umesh Kamat clarifies person named in Raj Kundra’s case is not him, slams media houses

सध्याच्या कायदेशीर परिस्थितीनुसार एखाद्या व्यक्तीने/संस्थेने कुणाचाही फोटो कोणत्याही प्रकारे प्रकाशित करून त्याच्या गोपनीयतेवर  हल्ला करणे बेकायदेशीर आहे. असे असल्यास तो किंवा ती भारतीय सर्वोच्च न्यायालयासमोर अनुच्छेद 32 अंतर्गत रिट (writ) याचिका दाखल करू शकते किंवा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत त्याच्या गोपनीयतेचा मूलभूत हक्क लागू करण्यासाठी कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाकडे दाद मागू शकते.

जर माध्यमांसारख्या सार्वजनिक भूमिकेचा वापर करून एखाद्या खासगी संस्थेने हे प्रकाशन केले असेल तर, त्या व्यक्तीला तरीही कलम २२ अंतर्गत उच्च न्यायालयात आपला किंवा तिच्या हक्काची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

डिफेमेशन अंतर्गत गुन्हा घडला असल्यास दंड किंवा 2 वर्षापर्यंत कारावास किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

 

 

https://youtu.be/Ccju9dqSFqg

 

 

Mruga Vartak

Recent Posts

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

46 mins ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

1 hour ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

2 hours ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

2 hours ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

2 hours ago

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

12 hours ago