32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्र'चिपळूण शहराने पहिल्यांदाच पाहिला महाभयंकर पूर'

‘चिपळूण शहराने पहिल्यांदाच पाहिला महाभयंकर पूर’

टीम लय भारी

चिपळूण :- चिपळूण शहर खोलगट भागात आहे. तरीही यापूर्वी इतका मोठा पूर कधीच शहरात आला नव्हता. पहिल्यांदाच शहराला पुराचा मोठा तडाखा बसल्याची माहिती शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे (The city of Chiplun witnessed the catastrophic floods for the first time).

आमदार भास्कर जाधव म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे आणि पालघर परिसरातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. व तात्काळ स्थानिकांना मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.

Video : पुरात वेढलेल्या चिपळूण, खेडला वाचविण्यासाठी मदत यंत्रणा लागली कामाला : विजय वडेट्टीवार

अजितदादा हे जनतेच्या मनातील ‘दादा’ : दत्तात्रय भरणे

उत्तर कोकणातील, ठाणे व पालघर येथील पूरपरिस्थिती वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली चर्चा

ठाणे व पालघर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, तसेच पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे यांच्याशी पूरामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थिती संदर्भात चर्चा केली आहे. तसेच लागेल ती सर्व प्रकारची मदत पूरग्रस्तांना तातडीने पोहोचवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. गरज पडल्यास हेलिकॉप्टरची ही मदत घ्या आणि स्थानिकांना सुरक्षित जागी पूर ओसरेपर्यंत स्थलांतरित करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. हवामान खात्याने पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने राज्यात काही ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. त्याच बरोबर स्थानिकांनी स्वतःच्या सुरक्षेसोबतच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुखमंत्र्यांनी केले आहे. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव अजय कोहिरकर, विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खळगे व कोकण जलसंपदा विभाग मुख्य अभियंता तिरमणवार इत्यादींची उपस्थिती होती.

नद्यांच्या धोका पातळीचा व पाण्याचा आढावा

रत्नागिरीतील जगबुडी नदी, वाशिष्ठी नदी, काजळी नदी, कोदवली, शास्त्री, बावनदी, या नद्या धोक्याची पातळी गाठून वाहत आहेत त्यामुळे या परिसरातील लोकांना खेड, चिपळूण, लांजे, राजापूर, संगमेश्वर भागांत हलविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे.

कोकण विभागातील जिल्ह्यातील पूरपरिस्थिती जाणून घेण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांसोबत चर्चा

सदर चर्चेत संबंधित अधिकाऱ्यांकडून बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, उल्हासनगर, भिवंडी, कर्जत, खोपोली, कसारा आणि विक्रोळी येथील पूर पातळी व सद्य परिस्थिती जाणून घेतली. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित जागी पोहोचवण्यासाठी अतिरिक्त बोटींचे प्रयोजन करण्याचे आदेश दिले गेले आहेत (Extra boats have been ordered to evacuate flood victims).

सीएए आणि एनआरसी पासून भारतीय मुसलमानांना धोका नाही – मोहन भागवत

Massive flooding in Chiplun as Vashishti river overflows; hundreds stranded

पालघर जिल्ह्यातील बिकट परिस्थिती

पालघर जिल्यातील नालासोपारा, नायगाव, विरार व खाडी पात्राजवळ राहणाऱ्या लोकांना सुद्धा पूर परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे. शहरीकरण झालेल्या अधिक लोकवस्ती असलेल्या ठिकाणीच पुरामुळे अनेकांचे नुकसान होत आहे. झोपडपट्ट्या तसेच कच्च्या चाळी पाण्यात बुडून गेल्या आहेत तसेच दुकानांमध्ये अर्ध्यावर पाणी साचले आहे. स्टेशनरी सामान, कागद, वह्या आणि पुस्तके पूर्ण भिजून निरुपयोगी झालेली आहेत. छोट्या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. झेरॉक्स, प्रिंटर यांसारख्या मशीन पाणी जाऊन खराब झालेल्या आहेत. उघड्या गटारातला गाळ वाहून येऊन घरांच्या, दुकानांच्या जमिनी काळ्या झाल्या आहेत व सर्वत्र दुर्गंधी येत आहे. पर्यायाने पालघर मधील गावे सुरक्षित असल्याचे समजते. मोबाईल फोनचे नेटवर्क काल रात्रीपासूनच नव्हते, एकट्या दुकट्या म्हातार्यांना दूर राहणाऱ्या आपल्या जीवलगांशी संपर्क करता येत नसल्याने त्यांच्यात तणावाचे वातावरण होते. आज सकाळी पाऊस कमी झाल्यापासून नेटवर्क पुन्हा मिळू लागले आहे. परंतु वीजप्रवाह मात्र वारंवार खंडित होतो आहे. तथापि नायगाव आणि विरार परिसरात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कोकण विभागाचा आढावा घेताना रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कोकण विभागाचे आयुक्त, रत्नागिरी जिल्ह्यातील पालक मंत्री अनिल परब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी चर्चा केली.

Chiplun witnessed the catastrophic floods for the first time
चिपळूणचा महापूर

रत्नागिरी पालक मंत्री अनिल परब यांनी दिले मदतीचे आश्वासन

‘धरणे व नद्या धोका पातळीवर पोहोचले आहेत व मोठ्या प्रमाणात त्यातून पाणी वाहत असल्यामुळे एवढी पूर परिस्थिती उद्भवली आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे बोटींची व्यवस्था आपण केलेली आहे. चार खाजगी बोटींसहित 2 नगरपालिकेच्या बोटी, तसेच कस्टमची एक बोट व कोस्ट गार्डची एक बोट अशा एकूण आठ बोटी चिपळूण येथे पुरवासीयांची मदत करण्यासाठी पोहोचल्या आहेत. त्याच बरोबर एनडिआरेफच्या 23-23 च्या दोन तुकड्या लोकांना मदत करण्यासाठी काही वेळातच पोहोचत आहेत.’, असे रत्नागिरी जिल्ह्यातील पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले (This was stated by Anil Parab, Guardian Minister of Ratnagiri district).

‘चिपळूण जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आवाक्याबाहेर गेली असताना आज सकाळी पासून पाण्याची पातळी वाढलेली नाही हा एकच दिलासा स्थानिकांना आहे. चिपळूण येथे येण्यासाठीचे सर्व रस्ते, गोव्यावरून चिपळूण येथे येणारा रस्ता तसेच मुंबई-चिपळूण रस्ता आणि कराडहून चिपळूण येथे येणारा रस्ता या तिन्ही महामार्गावर पाणी साचल्याने सगळे रस्ते बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत लोकांना धीर देण्यासोबतच स्थानिकांना मदत करण्याचे काम जोमाने चालू आहे’, असे चिपळूणचे शिवसेना आमदार भास्कर जाधव म्हणाले.

पूरग्रस्त ठिकाणांना सुरक्षित जागांशी जोडणारी उपनगरीय रेल्वे सेवा अजून सामान्यांसाठी बंदच!

प्रसंगी दळणवळणाची साधने ठप्प असल्याने प्रशासनाच्या मदतीशिवाय नागरिक काहीही करू शकत नाहीत. रस्त्यांवर पाणी साचल्याने आणि लहान सहन वाहने वाहून गेल्याने खाजगी रिक्षा आणि बसेस सेवा बंद झालेली आहे. अशा परिस्थितीत उपनगरीय रेल्वे सेवा चालू असत्या तर नागरिकांना सुरक्षित जागी पोहोचण्यास मदत झाली असती. ‘सतत येणाऱ्या संकटांना घाबरून ताळेबंदी आणि अधिक निर्बंध यापुढे मुख्यमंत्री काही पाहू शकतील काय?’, असा सवाल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केला. यावेळी त्यांनी निदान ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे अशांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करावी अशी विनंती केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी